मालकाच्या घरी पोहचताच सुमनसोबत भयंकर घडलं
मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोड येथे काही महिन्यांपासून घर काम करत असलेल्या सुमन कांबळे या काशिमिरा येथे वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे सुमन या बुधवारी सायंकाळी कामासाठी गेल्या होत्या. त्यावेळी घरकाम करत असलेल्या घराच्या दरवाजातच त्या गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे शेजारी राहणाऱ्या महिलेने पाहिले. त्यांनी अन्य नागरिकांना बोलावून लगेच जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्यापूर्वीच सुमन यांचा मृत्यू झालेला होता.
advertisement
सुमन वर हल्ला झाला तेव्हा त्या घरात एकट्याच होत्या. पोलिसांच्या अंदाजानुसार सुमन या घरकाम करत असलेल्या ठिकाणी राहत असलेल्या एका व्यक्तीने पूर्वीच्या रागातून हा हल्ला केल्याचा संशय आहे. आता पोलिसांनी यानुसार तपास सुरु केला असून अज्ञात आरोपीविरोद्धात गुन्हा दाखल केलेला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 9:31 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Shocking : भयानक! संसार उभा करण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं; मिरा रोडच्या त्या घटनेने सर्वजन सुन्न
