दहा महिन्यांच्या बाळाच्या आयुष्याशी खेळ
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या ग्रामीण भागातील एक महिला तिच्या दहा महिन्यांच्या बाळाला वारंवार ताप आणि अंगावर पुरळ येत होते. त्यामुळे बाळावर उपचार घेण्यासाठी ती गोवेली ग्रामीण रुग्णालयात गेली होती. डॉक्टरांनी बाळाची तपासणी केल्यानंतर औषधं लिहून दिली. त्यानंतर बाळाला रुग्णालयातून एक औषध देण्यात आले.
नेमकं हे कसं समोर आलं?
advertisement
धक्कादायक गोष्ट म्हणजे बाळाला दिलेली हे औषधा फेब्रुवारी 2026 मध्येच एक्सपायर झालेले होते. ही गोष्ट एका सामाजिक कार्यकर्तीच्या लक्षात आली. फक्त आणि फक्त तिच्या सतर्कतेमुळे हे औषधं बाळाला देण्यापूर्वीच मोठा अनर्थ टळला.
या घडलेल्या प्रकरणाची दखल घेत ठाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगितले. तसेच दोषींवरही कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
