TRENDING:

काळ आला होता पण..., टेम्पोची धडक, पोलीस कॉन्स्टेबल थेट पुलावरून खाली, मुंबईत थरार

Last Updated:

Lower Parel News : लोअर परळच्या दत्ता नलावडे पुलावर अतिशय भयानक एक घटना घडली आहे. घडलेल्या या घटनेत पोलिस चालक गंभीर जखमी झालेले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लोअर परळ परिसरातील सेनापती बापट मार्गावरील दत्ता नलावडे पुलावर मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. अचानक बिघाड झाल्याने एका टेम्पोचालकाने वाहन भर रस्त्यात वळवले आणि त्याच वेळी दुचाकीवरून जात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला जोरदार धडक बसली. या धडकेमुळे दुचाकीस्वाराचा तोल गेला आणि ते थेट पुलावरून खाली कोसळले.
police constable injured in Lower Parel bridge accident
police constable injured in Lower Parel bridge accident
advertisement

लोअर परळचा तो थरार

या अपघातात वांद्रे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अंकित सुर्वे जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार टेम्पो अचानक वळल्यामुळे सुर्वे यांना सावरता आले नाही. धडक इतकी जोरदार होती की ते वाहनासह पुलावरून खाली पडले.

पोलीस कर्मचाऱ्याने मृत्यूला दिला चकवा

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी अवस्थेत असलेल्या सुर्वे यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाली नसून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 वर्षांपासून काम, तरुणांना रंगमंचाशी जोडतायत गिरीश, अनोखा उपक्रम काय? Video
सर्व पहा

ही घटना ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून संबंधित पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ सेनापती बापट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मराठी बातम्या/मुंबई/
काळ आला होता पण..., टेम्पोची धडक, पोलीस कॉन्स्टेबल थेट पुलावरून खाली, मुंबईत थरार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल