ट्रेनमधून उतरताच महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, विरार येथे वास्तव्यास असलेल्या 39 वर्षीय सोनी मधेशिया या पहाटे मुंबईत पोहोचल्या. प्रवासानंतर त्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कुर्ला रेल्वे स्टेशनच्या दिशेने चालत जात होत्या. त्या वेळेस संपूर्ण परिसरात अंधार होता आणि गर्दीही नव्हती. याच संधीचा फायदा घेत दोन अनोळखी चोरांनी अचानक त्यांच्या वाटेत आले आणि महिलेला काही समजण्याआधी एकाने चाकू बाहेर काढून त्यांच्याकडे रोखला.
advertisement
चाकूचा धाक दाखवत त्यांनी महिलेला काहीही आवाज न करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या आणि हादरलेल्या महिलेला काहीही करता आले नाही. दरम्यान दुसऱ्या आरोपीने क्षणात त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले घटना इतकी लवकर घडली की महिलेने मदतीसाठी ओरडण्याआधीच दोन्ही आरोपीने पळ काढला.
घटनेनंतर महिलेने थेट नेहरूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.
