नयन खरटमल यांचा हा संग्रह केवळ छंदापुरता मर्यादित नाही, तर तो एक ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा ठरला आहे. जगातील जवळपास सर्व खंडांमधील देशांमधून त्यांनी नोटा, नाणी आणि टपाल तिकिटे जमा केली आहेत. यामध्ये लिबिया, इराक, इराक, केनिया, झिंबाब्वे, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, जपान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, आफ्रिका, श्रीलंका, नेपाळ, चीन, इजिप्त, कॅनडा, अर्जेंटिना, थायलंड अशा विविध देशांच्या चलनांचा समावेश आहे.
advertisement
नयन खरटमल यांनी सांगितले की, इयत्ता दहावीत असताना मला नोटा आणि नाणी संग्रह करण्याचा छंद लागला. लहानपणी रोडवर भेटलेल्या एक स्टॅम्प नंतर कुतूहल वाढत गेले आणि त्यातून नोटा, नाणी आणि स्टॅम्प संग्रह करण्याचा छंद वाढत गेला, पुढे विविध देशांच्या नोटा आणि स्टॅम्प संग्रह मी वाढवत गेलो.
नयन यांनी त्यांच्याकडे एक विशेष संग्रहालयासारखी गॅलरी तयार करण्यात आली आहे. येथे प्रत्येक देशाच्या चलनासोबत त्याची थोडक्यात माहिती, त्या काळातील चलनमूल्य, तसेच देशाचा झेंडा आणि भौगोलिक माहितीही दाखवली जाते.
स्टॅम्प्सच्या संग्रहात त्यांनी ऐतिहासिक घडामोडी, प्रसिद्ध नेते, खेळाडू, प्राणी-पक्षी आणि अंतराळ मोहिमा यांवरील विविध थीम्स जपल्या आहेत. काही स्टॅम्प्स तर आज दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या 1950 च्या दशकातील आहेत.





