भावाचा मृतदेह घेऊन जात असताना बहिणीचा अपघातात मृत्यू
सावित्रीदेवी भागवती प्रसाद यादव (वय 49, रा. मुंबई) असे मृत महिलेचे नाव आहे. मूळ उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबीय सध्या मुंबईत वास्तव्यास होते. सावित्रीदेवी यांचे भाऊ लालजी यादव (वय 65) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून मूळ गावी नेण्यात येत होता.
advertisement
रात्री एक वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात भरधाव वेगाने जाणाऱ्या त्यांच्या रुग्णवाहिकेने पाठीमागून ट्रकला जोराची धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेतून प्रवास करणाऱ्या सावित्रीदेवी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती भगवती प्रसाद यादव हे गंभीर जखमी झाले. इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी संदीपकुमार भगवती प्रसाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुग्णवाहिका चालकाविरुद्ध वैजापूर ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संदीपकुमार भगवती प्रसाद यादव यांच्या तक्रारीवरून रुग्णवाहिकेच्या चालकाविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
