चीजकेकचा प्रवास ‘मिमी’पासून सुरू झाला
चीजकेकच्या व्यवसायाची सुरुवात एका गोंडस कारणाने झाली. तिच्याकडे ‘मिमी’ नावाचा एक छोटासा कुत्रा आहे, ज्याला केक आणि बिस्किटं खूप आवडतात. त्याच्यासाठी केक बनवताना तिला बेकिंगची आवड निर्माण झाली. त्यानंतर तिने वेगवेगळे फ्लेवर्स, रेसिपीज शिकल्या आणि मग ही कला व्यवसायात उतरवायचा निर्णय घेतला.
चॅलेंज आणि सोशल मीडिया प्रसिद्धी
advertisement
4 ऑक्टोबर 2025 रोजी तिने या चीजकेक व्यवसायाची सुरुवात केली. सोशल मीडियावर दररोज आपल्या स्टॉलचे व्हिडिओ आणि ब्लॉग शेअर करत ती लोकांशी जोडली गेली. हळूहळू तिच्या चॅलेंजविषयी अनेकांना कुतूहल निर्माण झालं आणि अनेक जण तिच्या चीजकेकचा आस्वाद घेण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याजवळील स्टॉलवर पोहोचू लागले.
कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा
या प्रवासात तिच्या सोबत तिची आई , मैत्रीण खुशी आणि भाऊ नेहमी उभे राहिले. आठवड्याच्या दिवसांत ती परेल व्हिलेज येथे स्टॉल लावते, तर शनिवार-रविवारी शिवाजी पार्क येथे तिचा चीजकेक स्टॉल अनेकांना आकर्षित करतो.
स्वप्नवत सुरुवात, प्रेरणादायी यश
4 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या एका महिन्यात 50 हजार रुपये कमावून तिने सिद्ध केलं की इच्छाशक्ती, सातत्य आणि आत्मविश्वास असेल तर छोटा व्यवसायही मोठं स्वप्न साकार करू शकतो. शिक्षणासोबत स्वतःचा व्यवसाय उभा करत ही तरुणी आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे.