TRENDING:

मुंबई-नाशिक महामार्गावरून सुसाट, वाहतूक कोंडीचा प्रश्नच मिटला, गेमचेंजर पूल होतोय खुला!

Last Updated:

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच माजिवडा, खारेगाव, मुंब्रा तसेच भिवंडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रवास आता सुसाट होणार आहे. साकेत येथील नव्या खाडी पुलाचे बांधकाम अखेर पूर्ण झाले असून पुढील एक-दोन दिवसांत तो वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच माजिवडा, खारेगाव, मुंब्रा तसेच भिवंडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल.
मुंबई-नाशिक महामार्गावरून सुसाट, वाहतूक कोंडीचा प्रश्नच मिटला, गेमचेंजर पूल होतोय खुला!
मुंबई-नाशिक महामार्गावरून सुसाट, वाहतूक कोंडीचा प्रश्नच मिटला, गेमचेंजर पूल होतोय खुला!
advertisement

मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्या माध्यमातून सुरू आहे. ठाणे खाडीवर उभारलेला जुना साकेत पूल केवळ दोन पदरी असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत असे. विशेषतः सकाळी कार्यालयीन वेळेत आणि रात्री अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहनचालकांना दीर्घकाळ अडकून पडावे लागत होते. पावसाळ्यात पुलावर खड्डे पडल्याने परिस्थिती अधिक बिकट होत असे आणि त्याचा परिणाम ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरही होत होता.

advertisement

Mumbai: लोकलच्या गर्दीतून सूटका! आता ‘जल मेट्रो’ सुसाट, 10 मार्गांचा मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात!

या पार्श्वभूमीवर जुन्या पुलालगत चार पदरी नव्या पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. सुमारे 200 मीटर लांबीच्या या नव्या पुलाचे काम आता पूर्ण झाले असून सध्या त्याची भारवाहन क्षमता आणि सुरक्षिततेची अंतिम चाचणी सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार चाचणी पूर्ण होताच पुढील दोन दिवसांत नव्या पुलावरून वाहतूक सुरू केली जाईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वय 75 अन् 50 वर्षांची साथ, पुणेरी आजी-आजोबाची जोडी जोरात, पाहा भन्नाट Love Story
सर्व पहा

नव्या वाहतूक आराखड्यानुसार ठाण्याहून नाशिक, मुंब्रा, नवी मुंबई आणि भिवंडीच्या दिशेने जाणारी वाहतूक नव्या साकेत पुलावरून वळवण्यात येणार आहे. तर नाशिक, मुंब्रा, नवी मुंबई आणि भिवंडीहून ठाण्याकडे येणारी वाहतूक जुन्या पुलावरून सुरू राहील. या बदलामुळे वाहतुकीचे नियोजन अधिक सुरळीत होईल आणि वारंवार होणाऱ्या कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई-नाशिक महामार्गावरून सुसाट, वाहतूक कोंडीचा प्रश्नच मिटला, गेमचेंजर पूल होतोय खुला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल