नेमकं काय घडलं? सभागृहाचे कामकाज सुरू असताना खाजगी विद्यापीठांत कौशल्य विकास लागू करावे, हे विधेयक मंत्री मंगल प्रभात लोढा विधानपरीषदेत मांडत होतेय पण त्यांना विधेयक नीट मांडता येत नव्हते. तसेच त्यांना काही कामानिमित्त सभागृहातून लवकर निघणे गरजेचे होते. त्यामुळे "मला लवकर जायचे आहे, म्हणुन विधेयक नंतर मंजूर करा" अशी विनंती मंत्री लोढा यांनी केली. यावेळेस सभापती निलम गोऱ्हे म्हटल्या, " घ्या लवकर आताच मंजूर करुया" आणि काही वेळातच विधेयक मंजूर झाले. यामुळे मंत्री मंगलप्रभात लोढा सभापतींचे आभार मानले.
advertisement
काय म्हणाले लोढा? यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निलम गोऱ्हे यांचे विशेष आभार मानले. त्याचबरोबर निलम गोऱ्हे गेल्या काही वर्षांपासून ज्या प्रकारे सभागृहाचे कामकाज पाहत आहे, कारभार हाताळत आहेत ते काम कौतुकास्पद आहे, असं लोढा म्हणाले. यावर राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार यांनी टोला लगावला. "मग निलम गोऱ्हेंना पुन्हा सभापती करा", असं शशिकांत शिंदे म्हणाले. त्यावर लोढा यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे. "माझेच माझ्या हातात नव्हते" असे मंगलप्रभात लोढांनी शशिकांत शिंदेंना उत्तर दिले. याचा अर्थ माझे मंत्रीपद माझ्या हातात नव्हते, असं लोढांना म्हणायचं होतं. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
दुसरीकडे विधानपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आली आहे. खरंतर आजच्या घडीला महायुतीचे संख्याबळ मोठे आहे. त्यात भाजपाचे संख्याबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे विधानपरिषदेला नवा सभापती भाजपाच्या मर्जीतला मिळण्याची शक्यता अधिक आहे. अशात शशिकांत शिंदेंनी कौशल्य विकास मंत्री मंंगलप्रभात लोढांना टोला लगावला आहे.
जागा 11 उमेदवार 12; कुणाचा गेम होणार? महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळणार?
