TRENDING:

Mumbai Crime: वाद माय- लेकाचा, शिक्षा वडिलांना; जेवणाच्या वादावरून मुलाचा बापावर लोखंडी वरवंट्याने हल्ला

Last Updated:

Mumbai Crime: घरगुती कारणावरून झालेल्या वादातून मुलाने थेट वडीलांवर लोखंडी वरवंट्यानेच हल्ला केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईमध्ये क्षुल्लक कारणावरून मुलाने आपल्या बापाचीच हत्या केली आहे. या घटनेमुळे पवई परिसर हादरला आहे. घरगुती कारणावरून झालेल्या वादातून मुलाने थेट वडीलांवर लोखंडी वरवंट्यानेच हल्ला केला आहे. जेवणाच्या कारणावरून आईमध्ये आणि मुलामध्ये वाद झाला होता. पुढे त्यांच्या वादाचे रूपांतर मारामारीमध्ये झाले. वडील आणि मुलाच्या हल्ल्यामध्ये वडील जखमी असून त्यांच्यावर मुंबईतील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुलावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अद्यापही फरार आहे.
Mumbai Crime: वाद माय- लेकाचा, शिक्षा वडिलांना; जेवणाच्या वादावरून मुलाचा बापावर लोखंडी वरवंट्याने हल्ला
Mumbai Crime: वाद माय- लेकाचा, शिक्षा वडिलांना; जेवणाच्या वादावरून मुलाचा बापावर लोखंडी वरवंट्याने हल्ला
advertisement

पवई परिसरातील साकी विहार रोड परिसरात राहणारी सुतार फॅमिली वडापाव विक्रिचा व्यवसाय करते. या माध्यमातूनच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरी जखमी मनोहर सुतार (53), आई शांताबाई, पत्नी लता आणि सिद्धार्थ- अक्षय अशी दोन्ही मुलं असा परिवार आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, 26 डिसेंबर (शुक्रवार) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास लता कामावरून घरी परतल्या. त्या घरी परतल्या तेव्हा घरात पती मनोहर आणि मुलगा अक्षय दोघेही घरीच होते. जेवण मागण्याच्या कारणावरून आई लता आणि मुलगा अक्षय या दोघांमध्ये वाद झाला. आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलाने आईकडे जेवणाची मागणी केली. परंतु आधीच आईने बनवून ठेवलेले जेवण त्याला आवडत नसल्यामुळे त्याने दुसरं बनवून देण्याची मागणी केली.

advertisement

जेव्हा अक्षयने आईकडे जेवणाची मागणी केली, त्यावेळी तिने आधीच जेवण तयार असल्याचे सांगितले. मात्र, अक्षयने आईसोबत जेवण बनवण्याच्या मागणीवरून वाद घालण्यास सुरूवात केली. आईने अक्षयला ती थकल्याचं सांगितलं. त्यामुळे अक्षय आणखीनच चिडला. त्याने रागाच्या भरात आईला मारहाण करण्यास सुरूवात केली. आई आणि मुलातला वाद सोडवण्यासाठी वडील मनोहरमध्ये पडले. अक्षयच्या रागाचा पारा खूप वाढलेलाच होता. त्याने रागाच्या भरात वडीलांना स्वयंपाकात मसाला कुटण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी वरवंट्याने त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यामध्ये वडील मनोहर सुतार गंभीर जखमी झाले. वडीलांना जखमी अवस्थेत पाहून अक्षयने तिथून पळ काढला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?
सर्व पहा

वादामध्ये वडील आल्यामुळे त्यांच्यावर अक्षयने लोखंडी वरवंट्याने त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेनंतर आरोपी अक्षय घरातून पळून गेला. जखमी मनोहर यांनी पत्नीच्या मदतीने तात्काळ जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. घरगुती कारणामुळे झालेल्या वादामध्ये मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक घटनेचा गुन्हा पवई पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अक्षय सुतारवर 26 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अक्षयचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime: वाद माय- लेकाचा, शिक्षा वडिलांना; जेवणाच्या वादावरून मुलाचा बापावर लोखंडी वरवंट्याने हल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल