TRENDING:

spicejet: प्रवाशांचा जीव टांगणीला! मुंबईहून निघालेल्या spicejet विमानाचं इंजिन हवेतच फेल

Last Updated:

स्पाईसजेट SG670 विमानाचे कोलकाता नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर इंजिन बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित. मागील महिन्यात इंडिगोला वाराणसीत लँडिंग.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालेल्या स्पाईसजेट कंपनीच्या एका विमानाला रविवारी रात्री कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. विमानाच्या एका इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याचा अलर्ट पायलटला मिळताच, कोणतीही रिस्क न घेता तातडीने इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं.सुदैवाने, या विमानात असलेल्या सर्व प्रवाशांना कोणतीही इजा न होता सुरक्षित लॅण्डिंग करण्यात आलं.
News18
News18
advertisement

विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड

कोलकाता विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पाईसजेट SG670 हे मुंबईहून कोलकात्याकडे निघालं होतं. विमान कोलकात्याच्या जवळ पोहोचले असताना, वैमानिकाला विमानातील एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याची तांत्रिक सूचना मिळाली. समस्या लक्षात येताच, वैमानिकाने तत्काळ कोलकात्याच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि आपत्कालीन लँडिंगची मागणी केली. यानंतर, रात्री ११.३८ वाजता विमानाची सुरक्षित लँडिंग झाली आणि आपत्कालीन स्थिती पूर्णपणे काढून टाकण्यात आली.

advertisement

आपत्कालीन लँडिंगची सूचना मिळताच विमानतळ अधिकारी तातडीने सज्ज झाले. अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम विमानतळावर तैनात करण्यात आली. कोणतीही विपरीत परिस्थिती निर्माण झाल्यास, तातडीने मदत पोहोचवण्यासाठी ही तयारी ठेवण्यात आली होती. मात्र, पायलटच्या कौशल्यामुळे आणि अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे विमान सुरक्षित लॅण्ड करण्यात आलं.

मागील महिन्यातही घडली होती अशीच घटना

advertisement

विमानाच्या तांत्रिक बिघाडाच्या अशा घटना आता सामान्य होत चालल्या आहेत. मागील महिन्यातच कोलकाता ते श्रीनगर जाणाऱ्या 'इंडिगो कंपनीच्या एका विमानाला इंधनाची गळती झाल्यामुळे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली होती. इंडिगोच्या त्या विमानामध्ये १६६ प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यावेळीही सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. तांत्रिक पथकाने विमानाची तपासणी आणि दुरुस्ती केली होती.

advertisement

प्रवाशांचा जीव टांगणीला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

विमानांचे इंजिन बिघाड, इंधन गळती किंवा अन्य तांत्रिक अडचणींमुळे वारंवार होणाऱ्या आपत्कालीन लँडिंगच्या या घटना विमान प्रवाशांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या आहेत. विशेषत: जेव्हा एखादे विमान आपत्कालीन स्थितीत लँडिंगसाठी उतरते, तेव्हा विमानात बसलेल्या प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागलेला असतो. विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तांत्रिक तपासणीचे नियम अधिक कठोर करणे, हाच या समस्येवरील खरा उपाय आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
spicejet: प्रवाशांचा जीव टांगणीला! मुंबईहून निघालेल्या spicejet विमानाचं इंजिन हवेतच फेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल