मध्य रेल्वे
तारीख- 04 जानेवारी 2025
कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक- माटुंगा- मुलूंड मार्गावर धीम्या मार्गावर डाऊन आणि अप अशा दोन्हीही बाजूला मेगाब्लॉक असेल.
वेळ- सकाळी 11:05 ते दुपारी 03:55 वाजेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (Mumbai CSMT) येथून सकाळी 10:14 ते दुपारी 03:32 या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर, ठाणे येथून सकाळी 11:07 ते दुपारी 03:51 वाजेदरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड स्थानकावरून अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. डाऊन आणि अप या दोन्हीही मार्गांवरील लोकल शीव (सायन), कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुढे मुलुंड स्थानकावरून पुन्हा डाउन मार्गावर वळवण्यात येतील. तर, शीव ते सीएसएमटी पर्यंत धीम्या मार्गावरील लोकल पुढे पुन्हा जलद मार्गावरून रवाना केल्या जाणार आहेत. या कालावधीत लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा निश्चित ठिकाणी पोहोचतील. त्यामुळे प्रवाशांनी घरातून लवकरच निघण्याचा सल्ला रेल्वेकडून देण्यात येत आहे.
advertisement
हार्बर रेल्वे
ठाणे आणि वाशी/ नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स- हार्बर मार्गावर अप आणि डाउन मार्गावर लोकल सकाळी 11:10 ते संध्याकाळी 04.10 पर्यंत बंद राहतील. ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी/ नेरूळ अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ठाणे येथून सकाळी 10:35 ते 04:07 वाजेदरम्यान वाशी/ नेरूळ/ पनवेलकडे जाणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि पनवेल/ नेरूळ/ वाशी येथून ठाणेकडे जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा 10:25 ते 04:09 वाजेपर्यंत रद्द राहतील. पायाभूत सुविधा राखण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी मेगाब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार नाही.
