TRENDING:

Mumbai: 3 सेकंदात मृत्यू पाहून माघारी परतला अन् देवासारख्या टीसीशी शेकहँड केला, बोरिवली स्टेशनवरचा VIDEO व्हायरल

Last Updated:

मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर २२ मार्च २०२६ रोजी ही घटना घडली.  रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एका प्रवशाचा जीव वाचला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वंजारा, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई : रेल्वेनं प्रवास करत असताना दारात उभं राहू नका, धावत्या रेल्वेत चढू नका अथवा उतरू नका, असं आवाहन वारंवार केलं जात असतं, पण काही प्रवाशी जिवाची परवा न करता नको ते धाडस करत असतात. अशातच मुंबईतील बोरिवली रेल्वे स्टेशनवर एक अशीच एक घटना घडली. धावत्या रेल्वेमधून एका प्रवाशाने उतरण्याचा प्रयत्न केला पण तोल गेला आणि खाली पडला. रेल्वेखाली जाणार तेच स्थानकावर उभ्या असलेल्या टीसीने वाचवलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

advertisement

मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर २२ मार्च २०२६ रोजी ही घटना घडली.  रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एका प्रवशाचा जीव वाचला. धावत्या युवा एक्सप्रेस मधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा जीव बोरिवली स्थानकावरील तपासणी कर्मचाऱ्याने धाडस दाखवत वाचवला

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, युव्हा एक्सप्रेस बोरिवली स्थानकावर थांबत नसताना एक प्रवासी चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी तो तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधोमध अडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही परिस्थिती पाहताच स्थानकावरील तपासणी कर्मचाऱ्याने तत्काळ धाव घेत प्रवाशाला पकडून सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवर ओढून घेतलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पाण्यातून कमावला पैसा! संतोषने आईस गोळाचा ब्रँडच उभारला, दिवसाला 25 हजार कमाई!
सर्व पहा

कर्मचाऱ्याच्या या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला असून स्थानकावर उपस्थित प्रवाशांनीही त्याच्या धाडसाचे कौतुक केलं आहे. रेल्वे प्रशासनाने देखील या घटनेची नोंद घेत कर्मचाऱ्याच्या सतर्कतेचं कौतुक केलं आहे. तसंच प्रवाशांनी चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: 3 सेकंदात मृत्यू पाहून माघारी परतला अन् देवासारख्या टीसीशी शेकहँड केला, बोरिवली स्टेशनवरचा VIDEO व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल