हिमांशिका म्हणाली, 'राधिकाच्या वडिलांनी तिचं आयुष्य नरक बनवले होते. ते नेहमीच तिला नियंत्रित करायचे, तिला विरोध करायचे. राधिकाने तिच्या कठोर परिश्रमाने टेनिसमध्ये केवळ उंची गाठली होती. एवढंच नव्हे तर तिने स्वतःची टेनिस अकादमीही सुरू केली. ती स्वतःच्या हिंमतीवर आयुष्य जगत होती, पण तिचे कुटुंब आणि समाजातील लोक हे सहन करू शकले नाहीत. लहान कपडे घालणे, मुलांशी बोलणे आणि मुक्त विचारसरणी बाळगणे, यासाठी तिला अपमानास्पद वागणूक दिली जात होती.
advertisement
व्हिडिओमध्ये हिमांशिकाने सांगितले की, राधिका खूप निष्पाप आणि चांगल्या स्वभावाची होती. ती १८ वर्षांपासून टेनिस खेळत होती आणि तिला फोटो काढणे आणि व्हिडिओ बनवणे खूप आवडत होते. परंतु हळूहळू हे सर्व बंद झाले. तिचे पालक खूप रूढीवादी होते. समाज काय म्हणेल या भीतीने त्यांनी नेहमीच तिच्या यशात अडथळे आणले. मी तिच्यासोबत अनेक स्पर्धांना गेले. दोघं सोबत खेळलं. पण तिला कधीही कोणाशीही उघडपणे बोलताना पाहिले नाही. तिच्यावर नेहमी तिच्या पालकांचा कंट्रोल होता. सध्या मीडियामध्ये लव्ह जिहादबद्दल बोललं जातंय. पण जी मुलगी कुणाशीच फारशी बोलत नव्हती, ती असं कसं करेल. तो फक्त कमर्शिअल व्हिडीओ होता. एक ते दीड वर्षांपूर्वी शूट केला होता. पण वडिलांच्या विरोधानंतर तो तिने माघार घेतली होती.
हिमांशिकाने पुढे म्हटले, 'मला राधिकाबद्दलचे सत्य माहित आहे. गेल्या आठ-दहा वर्षांपासून आम्ही खूप जवळ होतो. "मी इतक्या लवकर याबद्दल बोलेन असे मला वाटले नव्हते, पण आता मी गप्प बसू शकत नाही. हिमांशिकाच्या या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे. या प्रकरणात अद्याप कोणत्याही हत्येची अधिकृत पुष्टी पोलिसांना करता आलेली नाही, परंतु सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे लोकांना धक्का बसला आहे. आता राधिकाच्या मृत्यूचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि हिमांशिकाच्या या दाव्यांवर पोलीस काही कारवाई करतात का? हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे.