आता त्यानंतर आणखी एक प्रकल्प हाती घेतला आहे. ठाणे- डोंबिवली प्रवास आता फक्त 25 मिनिटामध्ये पूर्ण होणार आहे. एमएमआरडीएने या प्रकल्पाला आता हिरवा कंदील दाखवला आहे. डोंबिवलीतील माणकोली उड्डाणपुलासोबत संलग्न असणाऱ्या रेतीबंदर मोठागाव रेल्वे फाटकावरील चार पदरी रेल्वे उड्डाणपूल बांधण्यास मंजूरी देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पांना मंजूरी दिली असून यामुळे मुंबई- ठाण्यालगतची वाहतूक कोंडी कमी होणार आहे. वाहतूक कोंडीमध्ये तासनतास लागणाऱ्या वेळेला आता कात्री लागणार आहे. तासनतास एकाच जागेवर थांबून प्रवासांचा वेळ वाया जात होता.
advertisement
ऑफिसला जाताना किंवा ऑफिसवरून घरी येत असताना ठाण्याहून डोंबिवलीला किंवा पुढे जात असताना अनेकदा प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे बराच वेळ ट्रॅफिकमध्ये फुकट जायचा. त्यामुळे आता या उड्डाणपुलामुळे हा प्रवास आणखीनच जलद होणार आहे. यामुळे ठाणे- डोंबिवली प्रवास अवघ्या 25 मिनिटांत होणार आहे. त्यामुळे ठाणे- डोंबिवलीकरांचे 35 मिनिटे वाचणार आहेत. सध्या ठाणे- डोंबिवली प्रवासाला 1 तासांची अवधी लागतो. आता या मोठागाव फाटकावरील उड्डाणपुलामुळे प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामासाठी 168 कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मोठागाव येथील रेल्वे फाटक हा अडथळा ठरत आहे. डोंबिवलीवरून माणकोली उड्डाणपुलामार्गे ठाण्याच्या दिशेने जाताना प्रवाशांना बराच वेळ लागत होता. पण आता मोठागाव रेल्वे फाटकावरूनच चार पदरी उड्डाणपूल बांधला जाणार आहे. सुरुवातीला या पुलाचा आराखडा दोन लेनचा होता, मात्र वाढत्या वाहतुकीचा विचार करून चार- लेन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुढील काही वर्षांसाठी वाहतूक सुरळीत राहील आणि नव्याने कोंडी निर्माण होणार नाही. MMRDA ने दिलेल्या आराखड्यानुसार, 168 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. यामधील 30 कोटी जमीन संपादनासाठी तर उर्वरित 138 कोटी बांधकामासाठी वापरले जाणार आहे. यामुळे 600 रहिवाशांना पुनर्वसित करावे लागणार आहे.
