मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस, नागरकोइल एक्सप्रेस आणि तिरुवनंतपुरम एक्सप्रेस गाड्यांच्या वेळांबाबत हा बदल दिसून येईल. रेल्वेच्या वेळांमधील बदलांची नोंद प्रवाशांनी घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. गाड्यांच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्यामुळे प्रवाशांनो या वेळांकडे लक्ष द्या.
advertisement
पुणे येथून निघालेली डेक्कन एक्स्प्रेस 25 ऑगस्टपासून मुंबई सीएसएमटी टर्मिनस येथे सायंकाळी 7 वाजून 5 मिनिटांऐवजी 7 वाजून 15 मिनिटांनी येईल. 25 ऑगस्टपासून नागरकोईल एक्स्प्रेस मुंबई सीएसएमटी टर्मिनल्स येथे सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांऐवजी 7 वाजून 5 मिनिटांनी येईल. तसेच तिरुवनंतपूरम एक्स्प्रेस 24 ऑगस्टपासून आठवड्यातून एकदा मुंबई सीएसएमटी टर्मिनल्स येथे 7 वाजून 15 मिनिटांऐवजी 7 वाजून 5 मिनिटांनी येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.






