दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे कॅबिनेट बैठक संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीष महाजन आणि चंद्रकांत पाटील दिल्लीला रवाना झाले आहेत. आज दिल्लीत भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये भाजप उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आज दुपारी दोन वाजता महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीला पक्षाच्या मुख्यालयात सुरुवात होणार आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह पक्षाच्या महाराष्ट्र कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
advertisement
दरम्यान भाजपकडून या बैठकीमध्ये उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सध्या महायुतीमध्ये तीन प्रमुख घटक पक्ष आहेत. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना, त्यामुळे आता कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार? भाजपच्या पहिल्या यादीमध्ये कोणाला संधी मिळणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.