पर्यटन अनुभव वाढवण्यावर भर
बोरिवली येथील या राष्ट्रीय उद्यानात आलेल्या प्रत्येक पर्यटकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी नवीन सेवा आणि सुधारणांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.ऐवढेच नाही तर उद्यानातील ऑर्किड फुलांच्या बागांच्या विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.
सिंह सफारीची तयारी पूर्ण
या उद्यात लवकरच सिंह सफारीची सुरुवात केली जाईल. या सफारीसाठी दोन सिंहांचे जोडपे आणि एक छावा वापरले जातील. सिंह सफारीसाठी प्राण्यांकरिता आधुनिक आणि सुरक्षित पिंजरे बनवले जात आहेत तसेच पर्यटकांना उत्कृष्ट दृश्य अनुभवासाठी सुविधा विकसित केल्या जात आहेत.
advertisement
वाघ सफारीमध्येही सुधारणा
सध्याच्या वाघ सफारीमध्येही सुधारणा केली जात आहे. सध्या या सफारीत 10 वाघ (2 नर, 5 मादी आणि 3 छावे) आहेत. याशिवाय, चंद्रपूरहून आणखी एका नर वाघाला आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.
