काल (27 सप्टेंबर)पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे रस्ते वाहतूकसह रेल्वे वाहतूक देखील काही मिनिटे उशिरा धावत होते. परंतू, पावसाचा काहीसा फरक रेल्वेवर पडला नाही. पावसामुळे बंद न पडलेली ही रेल्वे आता काही तांत्रिक कारणामुळे बंद पडली आहे. कर्जत रेल्वे स्थानकावर पॉईंट फेल्युअरमुळे रेल्वे सेवा गेल्या पाऊण तासापासून ठप्प पडली आहे. पॉईंट फेल्युअर म्हणजे, रूळ बदलणाऱ्या कामाला असं म्हणतात. एका रूळावरून दुसऱ्या रूळावरून जात असताना रेल्वे सेवेमध्ये बिघाड झाली.
advertisement
या तांत्रिक बिघाडाचा फक्त लोकल सेवेलाच नाही तर मेल एक्सप्रेसलाही फटका बसला आहे. खरंतर, मध्य रेल्वेवरील कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी पुढच्या पंधरा दिवसांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. या मेगा ब्लॉकच्या काळातच रेल्वे वाहतूक ठप्प पडल्याची घटना घडली आहे. कर्जत स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगच्या प्रकल्पासंबंधित 'प्री नॉन-इंटरलॉकिंग (PNI)' ची कामे हाती घेतले आहेत. या काळामध्ये, 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या काळामध्ये, कर्जत- खोपोली आणि कर्जत- सीएसएमटी सुद्धा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
27 सप्टेंबर (शनिवार) ते 30 सप्टेंबर (मंगळवार) या दिवसांमध्ये सकाळी 11:20 ते सायंकाळी 04:20 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाउन पनवेल मार्गावर नांगणाथ केबिन आणि कर्जत प्लॅटफॉर्म 2 व 3 दरम्यान, तसेच कर्जत प्लॅटफॉर्म 3 आणि चौक स्टेशन दरम्यान रेल्वे वाहतुकीवर परिणाम होईल. या ब्लॉकच्या कालावधीत कर्जत आणि खोपोली दरम्यान अप आणि डाउन मार्गावर कोणतीही लोकल ट्रेन सेवा उपलब्ध नसेल. कर्जत स्थानकावरू दुपारी 12, 1:15 आणि 3:39 वाजता सुटणाऱ्या कर्जत- खोपोली मार्गावरील लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर, खोपोली येथून सकाळी 11:20 वाजता आणि दुपारी 12:40 आणि 2:55 वाजता सुटणाऱ्या खोपोली- कर्जत लोकलही रद्द करण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, मेगाब्लॉकच्या काळामध्ये दुपारी 12:20 वाजता CSMT स्थानकावरून सुटणारी CSMT- खोपोली लोकल कर्जत स्थानकापर्यंतच शॉर्ट टर्मिनेट चालवण्यात येणार आहे. ती लोकल खोपोली स्थानकापर्यंत जाणार नाही. तर, दुपारी 01:48 वाजता खोपोली स्थानकावरून सुटणारी खोपोली- CSMT लोकल कर्जत स्थानकावरूनच सुटेल. मेगाब्लॉकच्या काळात लोकल खोपोली स्थानकापर्यंत न जात असल्यामुळे लोकल कर्जत स्थानकावरूनच सुटेल. दरम्यान, कर्जत स्थानकावरून दुपारी 12:00 आणि 1:15 वाजता सुटणारी कर्जत- खोपोली लोकलही 30 सप्टेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी रद्द करण्यात आली आहे. तर, खोपोली स्थानकावरून सकाळी 11:20 आणि दुपारी 12:40 वाजता सुटणारी खोपोली- कर्जत लोकलही रद्द करण्यात आली आहे.