Uddhav Thackeray on Abhishek Ghosalkar : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सूरूवात झाली आहे. आज ठाकरे बंधुंनी सकाळीच शिवसेना भवनात आपला 'शिवशक्ती वचननामा' सादर केला. या वचननाम्यानंतर शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळीआपल्या पारंपारीक दहिसरच्या 2 नंबर वॉर्डमध्ये आले होते. हा तोच वॉर्ड आहे, ज्यात विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची उमेदवार धनश्री कोलगे यांच्या विरूद्ध निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.त्यामुळे या वॉर्डमध्ये येताच उद्धव ठाकरे यांनी दिवंगत नेते अभिषेक घोसाळकर यांची आठवण काढत थेट भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांना चेकमेट दिला आहे.
advertisement
खरं तर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या तेजस्वी घोसाळकर आपल्या प्रचारा दरम्यान अनेकदा आपले पती दिवंगत तेजस्वी घोसाळकर यांची आठवण काढत असताना दिसतात. सतत प्रचारा दरम्यान या गोष्टी होत असल्याने तेजस्वी घोसाळकर वॉर्डमध्ये एकप्रकारे भावनिक खेळी केली करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जाते. तेजस्वी घोसाळकर यांच्या याच खेळीवर आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना चेकमेट दिला आहे.
आज मला खरंच अभिषेकची पण आठवण येते आहे. अभिषेक जर असता तर भाजपची हिम्मत झाली नसती, असे विधान करून उद्धव ठाकरे यांनी तेजस्वी घोसाळकर यांना एकप्रकारे चेकमेट दिला आहे.
विशेष म्हणजे यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी विनोद घोसाळकर यांचे देखील कौतुक केले. मला विनोद घोसाळकरांचा अभिमान आहे. तो शिवसेना प्रमुखांचा कट्टर शिवसैनिक आहे. त्याचं घर ज्यांनी फोडलं त्या वृत्तीचा पराभव करायला मी इकडे आलो आहे.ही घरफोडी वृत्ती ज्यांनी आज घराघरामध्ये भांडण लावली. आज त्यांनी विनोद घोसाळकरच्या घरात फुट पाडली.त्या फुटपाडू वृत्तीचा पराभव करायला मी इकडे आलो आहे,असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
विनोद मी तेजस्वीच्या विरोधात नाही आहे, पण मी तिला ज्याने फोडले त्या भाजपच्या विरोधात आहे, त्यामुळे मी भाजपचा पराभव करायला इकडे आलो,असे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
