सप्टेंबर 2025 महिन्यात एकूण सुमारे 49.79 लाखांहून अधिक यूपीआयद्वारे तिकीट व्यवहार झाले असून त्यातून 64.00 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यातल्या संख्येत आणखीन वाढ झाली असून जी 77.32 कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. तर नोव्हेंबर 2025 मध्ये यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून सुमारे 78.66 कोटी रूपयांचा महसूल मिळाल्याची नोंद आहे. तर, डिसेंबर 2025 मध्येही ऑनलाईन पेमेंटचे वाढते प्रमाण पाहता एकुण सुमारे 62.59 लाखांहून अधिक प्रवाशांनी युपीआयच्या माध्यमातून तिकीट व्यवहार केले आहेत. आतापर्यंत एसटी महामंडळाच्या तिजोरीत 83.67 कोटी रूपये महसुल जमा झाला आहे.
advertisement
नको सुट्ट्या पैशाची कटकट.. तिकीट काढा झटपट..!
एसटी महामंडळाने बस स्थानकांवर, तिकीट खिडक्यांवर तसेच प्रवासा दरम्यान कंडक्टरकडून यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवाशांच्या वेळेत अधिकाधिक बचत होत आहे. रोख रकमेचा आणि सुट्टे पैसे ठेवण्याचा त्रास प्रवासांचा आता कमी झाला आहे. अर्थातच, त्यामुळे सुट्ट्या पैशांवरुन कंडक्टरसोबत होणार्या अनावश्यक वाद- विवादाला आता अखेर पूर्णविराम मिळाला आहे. याबरोबरच अनेक कंडक्टर्सकडून होणारा पैशाचा गैरव्यवहार रोखण्यासाठी देखील डिजिटल पेमेंट प्रक्रियेची मदत झाली आहे. त्यामुळे यूपीआय व्यवहारांमुळे पारदर्शकता वाढली असून महसूल गळतीला आळा बसण्यास मदत होत आहे. येत्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर आणखीनच वाढेल, असा विश्वास एसटी प्रशासनाने आता व्यक्त केला आहे.
