राजमा हे उत्तर भारतात घेतलं जाणारं पीक आहे. थंड हवामानात हे पीक चांगल्या प्रकारे येते. प्रयोग म्हणून शेतकरी यांची लागवड करतात. असाच प्रयोग गजानन गिराम यांनी केला आहे. परतुर येथून त्यांनी ब्राझीलवा नावाचे वाण विकत घेतलं. दोन महिन्यांपूर्वी 30 किलो बियाणांची एक एकरात पेरणी केली आहे.
Success Story : शेतकऱ्यानं लावलं डोक, करतोय फायद्याची शेती, 3 महिन्यात दीड लाख कमाई
advertisement
सध्या हे पीक फुल अवस्थेत आहे. या पिकाला एकदा डवरणी, एकदा खुरपणी आणि एक वेळी खत दिलं आहे. आतापर्यंत दोन वेळा पाणी दिलं आहे. एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे. याला 7 ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतो. यामुळे हे पिक परवडते. एकरी एक लाख रुपये उत्पन्न या पिकातून मिळू शकते, असा विश्वास शेतकरी गजानन गिराम यांनी व्यक्त केला.
दरम्यान, गिराम यांनी केलेल्या या नाविन्यपूर्ण प्रयोगाची शेतकरी वर्गात चर्चा आहे. यामुळे ही राजमा शेती पाहण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतात भेट देत आहेत. मराठवाड्यात रबी पिकांना पर्यायी म्हणून हे नवं पीक पुढे येत असल्याचं पहायला मिळत आहे.





