नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वडाळ्याच्या प्रतीक्षानगर परिसरात एक दाम्पत्य आपल्या २५ वर्षीय मुलीसह वास्तव्यास आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मुलीच्या वडिलांचा आत्येभाऊ (दीर) त्यांच्याच घरी राहत होता. शनिवारी मुलीचे वडील आणि मुलगी दोघेही कामावर गेले होते, त्यामुळे घरी केवळ आई आणि तिचा दीर दोघेच होते.
सायंकाळी मुलगी जेव्हा कामावरून घरी परतली, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. तिने वारंवार दरवाजा ठोठावूनही आतमधून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. आरडाओरडा ऐकून शेजारीही मदतीला धावले, पण दीर दरवाजा उघडण्यास तयार नव्हता. "दरवाजा घट्ट बसला आहे, बाहेरून जोरात ढकला," असे सांगून तो वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत होता.
advertisement
अनैतिक संबंधांचा संशय
बराच वेळ गेल्यानंतर अखेर त्याने दरवाजा उघडला. मुलगी आत शिरली तेव्हा तिला समोरचे दृश्य पाहून धक्काच बसला. तिची आई विवस्त्र अवस्थेत गळफास लावलेल्या स्थितीत होती. आईला वाचवण्याऐवजी काका गप्प का बसला होता, असा प्रश्न मुलीनं विचारला. पण काकाला त्याचं उत्तर देता आलं नाही.
या घटनेनंतर पीडित मुलीनं आईचा मोबाईल तपासला असता, त्यातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. मृत महिला आणि तिच्या दिरामध्ये विवाहबाह्य संबंध असल्याचे काही चॅट्समधून स्पष्ट झालं. याच वादातून किंवा मानसिक त्रासातून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांची कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून मुलीने तत्काळ वडाळा टीटी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्या काकाविरुद्ध तक्रार दाखल केली. या घटनेमुळे संपूर्ण वडाळा परिसरात खळबळ उडाली आहे.
