गोरेगाव पूर्वमध्ये पाण्यासाठी कसरत
गोरेगाव पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 52 मध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महाराजा टॉवर गल्ली, जनरल ए. के. वैद्य मार्ग, कन्यापाडा यासह काही भागांत गेल्या काही वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तर काही वेळेस पाणीही येत नाही, अशी स्थिती आहे. महापालिकेच्या जलअभियंता विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर परिसरात 150 मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम मंजूर झाले आहे. मात्र, या कामाला मुहूर्त मिळाला नसल्याने काम लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करण्याशिवाय येथील रहिवाशांकडे पर्याय नाही.
advertisement
Mumbai Rain: कोकणात पावसाचं धुमशान, मुंबई-ठाण्यात धो धो कोसळणार, आजचा हवामान अंदाज
सांताक्रूझ पुर्वेकडे पाणीटंचाई
सांताक्रूझ पूर्व भागातील मराठा कॉलतीनत पटेल नगरलगत नवजीवन सोसायटी, दौलत सोसायटी, शांतीलाल कंपाऊंड भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. येथे पाण्याची अधिकृत वेळ पहाटे साडेचार ते सकाळी 11 आहे. तरीही पपाणीपुरवठा मध्येच 1 ते 2 तास खंडित होतो. तसेच कमी दाबाने पुरवठा होत असल्याने रहिवाशांना देखील मुबलक पाणी मिळत नाही.
वांद्रे पूर्व भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
वांद्रे पूर्वेकडील कलानगर भागात अनेक सोसायट्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. आर्टेक्ट अपार्टमेंटसह अनेक सोसायट्यांचा पाणीपुरवठा कमी झाला आहे. काही वेळा टँकर मागवण्याची वेळ येत असून शिवडी भागातील बहारी इमारत, मॉडर्न इमारत, सिद्धांचल इमारत परिसरात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागात पहाटे पाणीपुरवठा होतो. घाटकोपर पश्चिमेतील आझादनगर, चिरागनगर, पारशीवाडी भागात देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांत 82 टक्के पाणीसाठी आहे. तरीही पाण्यासाठी मुंबईकरांना कसरत करावी लागत आहे.