कोणत्या भागात पाणी टंचाई?
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर परिसरात आजपासून अर्थात दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी इमारत क्र. 192 येथे मुख्य जलवाहिनीवर पाण्याचे मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम म्हाडा प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात येणार आहे.
किती दिवस पाणीपुरवठा बंद?
या कामासाठी सकाळी 10.00 वाजल्यापासून पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. काम पूर्ण होईपर्यंत कन्नमवार नगर, विक्रोळी पूर्व या संपूर्ण परिसरात पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
जलवाहिनीवर पाण्याचा मीटर बसविण्याचे हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा आधीसारखा सुरू करण्यात येईल. कामादरम्यान काही काळ गैरसोय होण्याची शक्यता असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंतीही करण्यात आली आहे.
या कामामुळे भविष्यात पाणीपुरवठा अधिक व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. पाण्याचा मीटर बसविल्यामुळे पाण्याचा वापर आणि वितरण यावर अधिक अचूक नियंत्रण ठेवता येईल. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने हा प्रकल्प परिसरासाठी फायदेशीर ठरणार आहे. स्थानिक नागरिकांनी ही सूचना लक्षात घेऊन आपल्या दैनंदिन कामांचे नियोजन करावे आणि पाण्याची नासाडी टाळावी.
