दरम्यान जेव्हा बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्याचवेळी आणखी एक तरुणाच्या पायाला गोळी लागली होती. राज कनौजिया वय 22 वर्ष असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाला जखमी अवस्थेमध्ये पोलिसांनी बांद्रा येथील रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं आहे. त्या दिवशी घटनास्थळी नेमकं काय घडलं हे राज कनौजिया यांनं सांगितलं.
advertisement
राज याने दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी दसरा असल्यानं त्याला सुट्टी होती. तो एका दुकानामध्ये शिवणकाम करतो. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मी देवीचं दर्शन घेऊन घराकडे परतत होतो. त्यावेळी मी तिथे ज्यूस पिण्यासाठी थांबलो. मात्र थोड्याचवेळात घटनास्थळी अचानक गोंधळ उडाला. माझ्या पायाला कसली तरी दुखापत झाल्याचं मला जाणवलं. मी पाहिलं तर पायातून रक्त येत होतं. मला वाटलं की तिथे काही जण फटाके फोडत होते, त्यातील एखादा फटाका अंगावर आला असेल. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मला मंदिरात नेलं. तिथे मला कळालं की गोळी लागली आहे. त्यानंतर माला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, असं राज याने सांगितलं आहे. राजचं फेब्रुवारी महिण्यात लग्न होणार असून, त्याने प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.