मुंबई पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणात दाऊद कनेक्शन समोर आलं आहे, त्या अँगलने देखील तपास सुरू आहे. 28 दिवसांमध्ये या प्रकरणातील शूर्टर्सनी पाचवेळा सिद्दिकी यांच्या घर आणि कार्यालयाची रेकी केली. ते बाबा सिद्दिकी यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. शेवटी त्यांनी गोळीबारासाठी दसऱ्याचा दिवस निवडला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार झिशान अख्तर हा मुंबईबाहेर होता. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो मुंबईच्या बाहेर बसून हे सर्व ऑपरेशन चालवत होता. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी लागणारे सर्व शस्त्र हे पजांबमधून आल्याची माहिती देखील समोर आली आहे.
advertisement
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणारा आरोपी शिवकुमार गौतम याला लॉरेंस बिश्नोई गँगकडून टेलीग्राम आणि स्नॅपचॅटवर आदेश मिळत होते. शिवकुमार गौतम याला बिश्नोई गँगनेच गोळीबाराचा आदेश दिला होता. बिश्नोई गँगकडून जे आदेश मिळत होते, तो ते आदेश आपल्या इतर शूटरपर्यंत पोहोचवत होता. प्लॅनिंग करतानाच त्याला टारगेटबाबत सगळी माहिती सांगण्यात आली होती.