मिळत असलेल्या माहितीप्रमाणे हायप्रोफाईल वरळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून भाजप नेत्या शायना एन सी यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध भाजपा नेत्या शायना एन सी असा हायप्रोफाईल सामना या मतदारसंघात होण्याची शक्यता आहे. शायना एन सी या भाजपच्या नेत्या आहेत तसेच व्यावसायाने त्या फॅशन डिझाईनर देखील आहेत. शायना एन सी यांचे वडील नाना चूडासामा हे मुंबई शहराचे माजी शेरीफ होते.
advertisement
वरळी विधानसभा मतदारसंघ हा हायप्रोफाईल मतदारसंघ असून, यामध्ये वरळी विधानसभा मतदारसंघात बीडीडी चाळी, डिलाईल रोड, बीआयटी चाळी, जीजामाता नगर झोपडपट्टी, वरळी कोळीवाडा तसेच वरळी सी फेस विभागातील अनेक हायराईज टॅावर आणि उच्चभ्रू नागरिकांचे निवास्थानं आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदार संघाकडे सर्वांचं विशेष लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुती कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शायना एन सी यांची उमेदवार म्हणून चाचपणी करताना महायुतीच्या नेत्यांनी सर्वकष विचार करून त्यांची निवड केली असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.