भैयालाल रजक याची पत्नी विमला रजक (वय 38) आणि तिचा प्रियकर नारायण दास कुशवाह (48 वर्ष) तसंच कामगार धीरज कोल यांनी भैयालाल रजक झोपेत असताना त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. नारायण दास आणि धीरज यांनी रात्री 2 वाजता घरात घुसून भैयालाल रजक यांना मारहाण करून त्यांना ठार केले. याप्रकरणी विमला रजक, नारायण दास आणि धीरज या तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे. मध्य प्रदेशच्या अनुप्पूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे.
advertisement
केरळमध्ये पत्नीने पतीला संपवलं
दुसऱ्या एका घटनेत, दक्षिण केरळ जिल्ह्यातील नादुवाथूर येथे एका 41 वर्षीय पुरूषाची त्याच्या पत्नीच्या लिव्ह-इन पार्टनरने चाकूने वार करून हत्या केली आहे. श्यामसुंदर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. श्यामसुंदर हा नेदवाथूर येथील कुझिक्कट्टू जंक्शनचा रहिवासी होते. श्यामसुंदरच्या घराजवळ राहणाऱ्या धनेश (वय 37) याने ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
श्यामसुंदर याची पत्नी आणि मुल मागच्या 4 वर्षांपासून धनेशसोबत राहत होते, यावरून धनेश आणि श्यामसुंदर यांच्यात वारंवार वाद होत होते. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास, श्यामसुंदर याने धनेशवर पत्नी आणि मुलाच्या मदतीने मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला, यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर शेजाऱ्यांनी हस्तक्षेप करून धनेशला तिथून पाठवण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयसोबत बोलताना सांगितलं.
रात्री 11.50 वाजण्याच्या सुमारास धनेश परत आला आणि त्याने पुन्हा एकदा श्यामसुंदरसोबत वाद घालायला सुरूवात केली, यानंतर त्याने धारदार शस्त्राने श्यामसुंदरवर वार केल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. यानंतर शेजाऱ्यांनी श्यामसुंदरला जवळच्या रुग्णालयात नेलं, पण शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुथूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. धनेशला लवकरच अटक केली जाईल, तसंच श्यामसुंदरचा मृतदेह पोस्टमार्टमनंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.