नेत्र विभागातील डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांच्या दोन्ही डोळ्यांच्या पापण्यांमध्ये उवा फिरताना दिसल्या. डॉक्टरांना सुरुवातीला हे दृश्य पाहूनच आश्चर्याचा धक्का बसला. पापण्यांमध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल २५० जिवंत उवा असल्याचं निदर्शनास आलं. डॉक्टरांच्या मते, उवांनी पापण्यांच्या केसांच्या मुळाशी अंडी घातली होती आणि त्यामुळे संक्रमण झपाट्याने वाढत होतं.
कशा काढल्या उवा?
advertisement
डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले. या उवांची प्रकाशाप्रती संवेदनशीलता असल्याने आणि डोळ्यांच्या नाजूक भागामुळे इंजेक्शन किंवा कोणतेही तीव्र औषध वापरणे धोकादायक ठरले असते. त्यामुळे डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि सूक्ष्म उपकरणांच्या साहाय्याने हातानेच उवा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया जवळपास दोन तास चालली. अखेर सर्व उवा काढण्यात डॉक्टरांना यश आलं.
वैद्यकीय भाषेत याला काय म्हणतात?
वैद्यकीय भाषेत या दुर्मिळ अवस्थेला ‘फ्थिरायसिस पॅल्पेब्ररम’ (Phthiriasis Palpebrarum) असं म्हणतात. ही अवस्था प्रामुख्याने पापण्यांमध्ये उवांच्या संक्रमणामुळे निर्माण होते. हे प्रकरण इतकं दुर्मिळ आहे की, नेत्ररोग तज्ज्ञांनाही अशा प्रकारचा अनुभव क्वचितच येतो.
स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचं आवाहन
सावरकुंडला रुग्णालयातील डॉक्टरांच्या दक्षतेमुळे गीताबेन यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांना पुढील काही दिवस औषधोपचार सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण वैद्यकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात असून, स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
