TRENDING:

तालिबान पाकिस्तानच्या घरात घुसला, बाहेर भारत उभा; अफगाणिस्तानला इंडियाचा फुल्ल सपोर्ट, जैसलमेर बॉर्डरजवळ एअरफोर्स पाठवले

Last Updated:

Pakistan Trapped Between Two Fronts: अफगाण तालिबानच्या हल्ल्यांनी पाकिस्तानच्या सत्तेला हादरे बसत असतानाच, भारताने पोखरणमध्ये 'वायू शक्ती'द्वारे पाकिस्तानची पूर्वेकडील बाजूही दणाणून सोडली आहे. दोन्ही सीमांवर एकाच वेळी युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याने पाकिस्तानची लष्करी आणि राजकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली/जैसलमेर: दक्षिण आशियात युद्धाचा वणवा पेटला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या शेजारील देशांमध्ये 'खुली जंग' सुरू झाली असून, दोन्ही देशांच्या राजधानीत (काबुल आणि इस्लामाबाद) बॉम्बचे गोळे बरसत आहेत. या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतानेही आपल्या पश्चिम सीमेवर अत्यंत सतर्कता बाळगली असून जैसलमेरच्या पोखरणमध्ये भारतीय वायूसेनेने आपली ताकद दाखवून दिली.
News18
News18
advertisement

पाक-अफगाण युद्ध आणि भारताची रणनीती

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ‘ऑपरेशन गझब लिल-हक’ अंतर्गत हवाई हल्ले केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल अफगाण तालिबानने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला लक्ष्य केले. सीमेपलीकडे दोन शत्रू एकमेकांवर तुटून पडले असताना, भारताने आपल्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी राजस्थानच्या सीमेवर हालचाली तीव्र केल्या आहेत. पोखरणच्या वाळवंटात विमानांच्या गर्जनेने आणि बॉम्बवर्षावाने पाकिस्तानच्या सीमेपर्यंत थरकाप उडाला आहे.

advertisement

पोखरणमध्ये शत्रूचे बंकर आणि धावपट्ट्या उद्ध्वस्त!

भारतीय वायूसेनेने या सरावातून स्पष्ट संदेश दिला आहे की, भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आमची तयारी पूर्ण आहे.

विमानांचा जलवा: राफेल (Rafale), सुखोई (Su-30MKI), तेजस (HAL Tejas) आणि मिराज 2000 या विमानांनी प्रत्यक्ष युद्धाचा सराव करताना शत्रूचे बंकर, विमानांच्या धावपट्ट्या (Runways) आणि कमांड सेंटर्स अचूकपणे नष्ट केले.

advertisement

हेलिकॉप्टर्सची कामगिरी: अपाचे (Apache) आणि चिनूक (Chinook) हेलिकॉप्टर्सनी जमिनीच्या जवळून उड्डाण करत रॉकेट डागले आणि युद्धभूमीतून रसद पुरवण्यासह जखमींना हलवण्याचा यशस्वी सराव केला.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि 'नेटवर्क-सेंट्रिक' वॉरफेअर

अचूक वेध: प्रगत रडार आणि ड्रोनच्या मदतीने शत्रूची लपलेली ठिकाणे शोधून त्यांच्यावर अचूक हल्ले करण्यात आले.

रात्रंदिवस सज्जता: दिवस असो वा रात्र, भारतीय वायूसेना शत्रूवर कधीही प्रहार करू शकते, हे या युद्धाभ्यासातून सिद्ध झाले.

advertisement

हवाई वर्चस्व: हवाई दल आणि जमिनीवरील सैन्य यांच्यातील ताळमेळ (Ground Support) अधिक भक्कम करण्यात आला.

सीमेवर हालचाली वाढल्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबाच्या दरात उलथापालथ, आल्याला 9000 रुपये मिळाला भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

पाकिस्तानी लष्कराने अफगाण सीमेवर आपली ताकद वळवली असताना भारतीय वायूसेनेचा हा सराव पाकिस्तानसाठी चिंतेची बाब ठरत आहे. पोखरणच्या आकाशात झेपावणाऱ्या राफेल आणि सुखोईच्या गर्जनेने सीमेपलीकडे भारताच्या सज्जतेची जाणीव करून दिली आहे.

मराठी बातम्या/देश/
तालिबान पाकिस्तानच्या घरात घुसला, बाहेर भारत उभा; अफगाणिस्तानला इंडियाचा फुल्ल सपोर्ट, जैसलमेर बॉर्डरजवळ एअरफोर्स पाठवले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल