AAIB च्या 15 पानांच्या अहवालानुसार, विमानाने १८० नॉट्सचा कमाल निर्देशित एअरस्पीड (IAS) गाठला. त्यानंतर लगेचच, इंजिन-1 आणि इंजिन-2 चे इंधन कट-ऑफ स्विच (जे इंजिनला इंधन पाठवतात) 'RUN' वरून 'CUTOFF' स्थितीत हलले आणि तेही फक्त 1 सेकंदाच्या अंतराने, ज्यामुळे इंजिनमध्ये इंधन येणे बंद झाले आणि दोन्ही इंजिनचा N1 आणि N2 रोटेशन स्पीड वेगाने कमी होऊ लागला.
advertisement
दोन्ही पायलटचं धक्कादायक संभाषण
अहवालात असेही उघड झाले की कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एका पायलट दुसऱ्याला 'तू इंजिन का बंद केले?' असे विचारताना ऐकू आले. यावर उत्तर देताना, दुसऱ्या पायलटने म्हटले, 'मी काहीही केले नाही.' दोन्ही पायलटनी इंजिन आपण इंजिन बंद केलेलं नाही, हे स्पष्टपणे सांगितलं आहे.
इंजिन रिलाईट करण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी
अहवालानुसार, दोन्ही इंजिनमध्ये रिलाईटची प्रक्रिया सुरू झाली. इंजिन-1 काही प्रमाणात रिकव्हर होऊ लागले, परंतु इंजिन-2 पूर्णपणे वेग परत मिळवू शकले नाही. या दरम्यान, APU (ऑक्झिलरी पॉवर युनिट) देखील ऑटोस्टार्ट मोडमध्ये सक्रिय झाले, परंतु ते देखील विमानाला स्थिर करू शकले नाही.
विमानतळाच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर असे दिसून आले की विमानाचा रॅम एअर टर्बाइन (RAT) म्हणजेच आपत्कालीन पंखा टेकऑफनंतर लगेच बाहेर आला. सहसा, विमानाच्या वीज पुरवठ्यात समस्या आल्यावरच RAT बाहेर येतो. याचा अर्थ असा की इंजिन बंद पडल्याने विमानाच्या मुख्य वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला.
रॅम एअर टर्बाइन हे एक लहान प्रोपेलरसारखे उपकरण आहे जे दोन्ही इंजिन बंद झाल्यावर किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यावर किंवा हायड्रॉलिक बिघाड झाल्यास आपोआप तैनात होते. हे डिव्हाईस विमानाला उंची राखण्यास मदत करते. आपत्कालीन वीज निर्माण करण्यासाठी RAT वाऱ्याच्या वेगाचा वापर करते.
अपघातापूर्वी 'मेडे' कॉल, नंतर क्रॅश
अहवालात म्हटले आहे की EAFR रेकॉर्डिंग ०८:०९:११ वाजता थांबले. यापूर्वी सुमारे ०८:०९:०५ वाजता, एका पायलटने 'मेडे मेडे' कॉल पाठवला. एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसीओ) ने यावर प्रतिसाद दिला परंतु त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. एटीसीओने धावपट्टी ओलांडण्यापूर्वी विमान खाली पडताना पाहिले आणि आपत्कालीन सेवा सुरू केल्या. अग्निशमन दलाचे पथक ०८:१४:४४ वाजता विमानतळावरून निघाले, त्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या पथकांनीही बचाव कार्य सुरू केले.
260 जणांचा मृत्यू
12 जून रोजी अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बोईंग 787-8 विमान (फ्लाइट एआय 171) टेकऑफनंतर लगेचच मेडिकल हॉस्टेलला जाऊन धडकले. या भीषण अपघातात 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह 260 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात फक्त एक प्रवासी वाचला.