1990 मध्ये उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव यांचं सरकार होतं तेव्हा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. कुणालाही अयोध्येत सोडलं जात नव्हतं. त्यावेळी अशोक सिंघल यांनी प्रण केला आणि ते प्रयागराजमध्ये गेले. अयोध्येमध्ये अडवलं तेव्हा आम्ही तर साधे शेतकरी, असं म्हणून त्यांनी त्यांच्या साथीदाराला आज कशाला काम काढलं म्हणत झापलं, त्या सगळ्या प्रसंगानंतर अशोक यांच्यावर पोलिसांचा विश्वास बसला. त्यांनी अयोध्येत सोडलं. बस्स तिथून अशोक सिंघल यांचा प्रवास सुरू झाला आणि त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज मोदी सरकारने पूर्ण केलं.
advertisement
अशोक सिंघल यांनी अयोध्येत राम मंदिर व्हावं याचं एक स्वप्न पाहिलं. 1987 मध्ये त्यांनी अयोध्येतील राम मंदिराचा पहिला नकाशा देखील तयार केला होता. बिहारच्या सोनपुरा इथे हा नकाशा तयार करण्यात आल्याचं सांगितलं जातं. प्रयागराज इथे या नकाशाला पुढे नेण्याची संमती मिळाली आणि त्यावर मोहोर लावण्यात आली.
अयोध्येतील भव्य राम मंदिराचा इतिहास फार जुना आहे. या मंदिराच्या बांधणीचा नकाशा तयार झाल्यावर, ३५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८९ साली प्रयागराज इथे संगमच्या तीरावर भरलेल्या कुंभमेळ्यात देशभरातील साधू-संतांनी या नकाशाला अंतिम मंजुरी दिली होती. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंघल लाकडी नकाशा घेऊन कुंभमेळ्यात पोहोचले होते. अनेक तास विचारविनिमय केल्यानंतर संतांनी मंदिराच्या भव्यतेवर आणि रचनेवर शिक्कामोर्तब केला होता. याच नकाशाच्या आधारावर राम मंदिर बांधण्यात आलं, यात काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत.
कुंभमेळ्यात नकाशाला मंजुरी मिळाल्यानंतर, राम मंदिरासाठी दगड कोरण्याचे काम लगेचच १९९० मध्ये सुरू करण्यात आलं. सिंघल यांनी राम मंदिराच्या कार्यात मोठी भूमिका बजावली, ज्यामुळे त्यांना अनेक लोक राम मंदिराचे 'मुख्य शिल्पकार' देखील म्हणतात. सिंघल यांनी आंदोलनाच्या वेळी त्यांनी राम मंदिरासाठी पैसे न मागता, दगडांचे दान करण्याचे आवाहन केलं होतं.
अशोक सिंघल यांचा जन्म २७ सप्टेंबर १९२६ रोजी अलीगढमध्ये झाला असला, तरी त्यांचे वडील महावीर सिंघल हे प्रयागराज सिटी मॅजिस्ट्रेट होते. त्यामुळे सिंघल यांचे सुरुवातीचे शिक्षण प्रयागराजमध्येच झाले. त्यानंतर त्यांनी वाराणसीतील बीएचयू मधून बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. १९८४ मध्ये त्यांनी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित केलेल्या 'संसद'चे संचालन केले होते. याच ठिकाणी राम जन्मभूमी आंदोलनाची रणनीती पहिल्यांदा निश्चित करण्यात आली होती.
राम मंदिराच्या आंदोलनासाठी अशोक सिंघल यांनी देशभर फिरून ५० हजार भाविकांना एकत्र आणलं होतं. १९९२ मध्ये वादग्रस्त ढाचा पाडणाऱ्या कारसेवकांचे नेतृत्वही त्यांनीच केलं होतं. त्यांनी २० वर्षे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. प्रयागराजमध्ये असलेले त्यांचे वडिलोपार्जित घर महावीर भवन त्यांनी दान केलं होतं आणि आजही तिथे अरुंधती वशिष्ठ अनुसंधान पीठ कार्यरत आहे. प्रदीर्घ आजारानंतर १७ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांचे निधन झालं.
