आरोपी गुजरातचा
आरोपीने त्याचं नाव राजेश खिमजी असं सांगितलं आहे आणि तो गुजरातमधील राजकोटचा रहिवासी असल्याचं सांगितलं आहे. त्याचं नाव आणि पत्ता पडताळला जात आहे. त्याची कागदपत्रे देखील तपासली जात आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
नेमकं काय झालं?
जनसुनावणीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी दिलेली माहिती दिली. जनसुनावणी सुरू असतानाच एका व्यक्तीने मुख्यमंत्री यांना काही कागदपत्रे दिली आणि नंतर अचानक त्यांचा हात पकडून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला. या धक्काबुक्कीदरम्यान लोकांनी त्या व्यक्तीला पकडले. या घटनेमागचे कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत.
advertisement
मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर
वीरेंद्र सचदेवा यांनी पुढं सांगितलं की, मुख्यमंत्री यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. त्या एक खंबीर महिला आहेत, मात्र त्यांच्या डोक्याला थोडी दुखापत झाली आहे. राजकारणात अशा प्रकारच्या घटना घडणे दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
दरम्यान, मी उत्तम नगरहून गटाराच्या तक्रारीसह आलो होतो. जेव्हा मी गेटवर पोहोचलो तेव्हा मुख्यमंत्र्यांना थप्पड मारल्यामुळे गोंधळ उडाला, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे. झालेला प्रकार चुकीचा आहे, असंही त्याने यावेळी सांगितलं.