रामजन्मभूमी मंदिर संपूर्ण देशात चर्चेचा विषय राहिला आहे. आजच्या कार्यक्रमादरम्यान मंदिराच्या आतीलन मनमोहक फोटो समोर आले आहेत.
advertisement
या फोटोंमध्ये राम मंदिराच्या आतील सौंदर्य स्पष्टपणे दिसून येते. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली 15 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत हे विधी पार पाडले जात आहेत.
या खास छायाचित्रांमध्येही राम मंदिराची भव्यता दिसून येते.
मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या मूर्ती अप्रतिम दिसतात. या कलाकृतींमध्ये भगवान राम व्यतिरिक्त भगवान कृष्णाच्या मूर्तीही दिसतात.
राम मंदिराबाबत बोलायचे झाले तर मंदिर परिसरात आणखी सहा मंदिरे बांधली जात आहेत. सिंह गेटमधून राम मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पूर्वेला एक मुख्य दरवाजा असेल जिथून भाविक संकुलात प्रवेश करतील.
रिपोर्टनुसार, राम मंदिरात एकूण पाच घुमट बांधले जाणार आहेत. त्यापैकी तीन घुमट तयार आहेत, तर चौथा घुमट बांधकामधीन आहे.
या सोहळ्यासाठी 'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र'ने उद्योगपती गौतम अदानी, मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांच्यासह सुमारे 8 हजार लोकांना आमंत्रणे पाठवली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकूण 8 हजार निमंत्रित लोकांपैकी देशभरातील सुमारे 6 हजार संत आणि पुरोहित सहभागी झाले होते. तर उर्वरित 2 हजार लोक विविध भागातील व्हीव्हीआयपी आहेत.
1990 मध्ये पोलिसांच्या गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सुमारे 50 कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
एवढेच नाही तर या कुटुंबांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्थाही विश्व हिंदू परिषदने केली आहे.
ट्रस्टने कारसेवकांच्या कुटुंबांसाठी तीन टेंट सिटी उभारली असून, तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.