TRENDING:

Ram Mandir : प्रायश्चित्त पुजेने सुरु होणार प्राणप्रतिष्ठा, अनुष्ठानाला सुरुवात; कसे आहेत 22 जानेवारीपर्यंतचे कार्यक्रम

Last Updated:

अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी संबंधित विधींना आजपासून (16 जानेवारी) सुरुवात होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अयोध्या : अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याशी संबंधित विधींना आजपासून (16 जानेवारी) सुरुवात होणार आहे. प्रायश्चित्त पूजेने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची औपचारिक सुरुवात होईल. सकाळी 9 वाजून 30 मिनिटांपासून पूजेला सुरुवात होईल. सुमारे पाच तास हा प्रायश्चित्त पूजा विधी सुरू असेल. यजमान प्रायश्चित्त पूजनापासून पूजेची सुरुवात करतील.
News18
News18
advertisement

प्रायश्चित पूजा म्हणजे काय?

प्रायश्चित्त पूजा ही पूजा करण्याची एक पद्धत आहे. ज्यामध्ये शारीरिक, आंतरिक, मानसिक आणि बाह्य अशा प्रकारे प्रायश्चित्त केलं जातं. तज्ज्ञांच्या मते, बाह्य प्रायश्चितासाठी 10 पद्धतींनी स्नान केलं जातं. यामध्ये पंच द्रव्याशिवाय भस्मासह अनेक औषधी पदार्थांनी स्नान केलं जातं.

दानसुद्धा प्रायश्चिताचा भाग

गोदान हे प्रायश्चित्त आहे आणि एक संकल्पदेखील आहे. यामध्ये यजमान गोदानाद्वारे प्रायश्चित्त करतात. संपत्ती दान केल्याने देखील प्रायश्चित्त होतं. एखादी व्यक्ती प्रायश्चित्तासाठी सोनं देखील दान करू शकते.

advertisement

प्रायश्चित पूजा कोणं करतं?

एखाद्या धार्मिक कार्यासाठी विधी किंवा यज्ञ केला जातो. या विधीला बसण्याचा अधिकार फक्त यजमानाला असतो. हे कर्तव्य यजमानाला पार पाडावं लागतं. साधारणपणे पुजाऱ्यांना हे प्रायश्चित्त करावं लागत नाही. पण, या पूजेत यजमानाला अशा प्रकारचं प्रायश्चित्त करावं लागतं. यामागचा मूळ उद्देश असा आहे की, जर आपण जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे काही पाप केलं असेल त्याचं प्रायश्चित्त केलं पाहिजे. कारण, आपण अशा अनेक प्रकारच्या चुका करतो ज्यांची आपल्याला कल्पनाही नसते. त्यामुळे शुद्धीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. या विधीला 'पवित्रकरण' असंही म्हणतात.

advertisement

कर्मकुटी पूजा म्हणजे काय?

कर्मकुटीचा अर्थ यज्ञशाळा पूजा असा होतो. आपण यज्ञशाळा सुरू होण्यापूर्वीच यज्ञकुंड किंवा वेदीची पूजा करतो. भगवान विष्णूची पूजा केल्यानंतरच यज्ञकुंडाची पूजा केली जाते, त्यांना विधीप्रमाणे पूजेसाठी आत नेलं जातं. प्रत्येक क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी पूजा केली जाते. ती पूजा केल्यावर यजमानाला मंदिरात जाण्याचा आणि पूजा करण्याचा हक्क मिळतो.

advertisement

पूजेचा कालावधी

प्रायश्चित्त पूजेला किमान दीड ते दोन तास लागतील आणि विष्णूपूजेलाही तेवढाच वेळ लागेल. म्हणजेच आज सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी पूजाविधी सुरू होईल आणि सुमारे 5 तास चालेल. 121 ब्राह्मण ही पूजा करतील.

अयोध्येतील विविध विधींचे वेळापत्रक

- 16 जानेवारीपासून पूजेची प्रक्रिया सुरू होईल.

- 17 जानेवारी रोजी श्रीविग्रहाच्या परिसराला भेट आणि गर्भगृहाचे शुद्धीकरण केलं जाईल.

advertisement

- 18 जानेवारीपासून अधिवास सुरू होईल. दिवसातून दोन वेळा जल-अधिवास, सुगंध आणि गंध-अधिवास देखील होईल.

-19 जानेवारी रोजी सकाळी फळ आधिवास आणि धान्य आधिवास असेल.

-20 जानेवारीला सकाळी फुले व रत्नांचा आणि संध्याकाळी घृत अधिवासाचा कार्यक्रम होईल.

-21 जानेवारी रोजी सकाळी साखर, मिठाई आणि मध अधिवास व औषध आणि शैय्या अधिवास होईल.

-22 जानेवारी रोजी दुपारी रामलल्लाच्या मूर्तीच्या डोळ्यांवरील पट्टी काढून त्यांना आरसा दाखवला जाईल.

मराठी बातम्या/देश/
Ram Mandir : प्रायश्चित्त पुजेने सुरु होणार प्राणप्रतिष्ठा, अनुष्ठानाला सुरुवात; कसे आहेत 22 जानेवारीपर्यंतचे कार्यक्रम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल