48,000 कोटींचा करार, 83 विमानांची ऑर्डर
IAF ने HAL सोबत 83 तेजस Mk-1A विमानांसाठी सुमारे 48,000 कोटी रुपयांचा करार केला होता. मात्र इंजिनांच्या उशिराने झालेल्या पुरवठ्यामुळे विमानांच्या डिलिव्हरीत विलंब झाला होता. HAL कडून मार्च 2024 पर्यंत ही डिलिव्हरी अपेक्षित होती. परंतु आता ही प्रक्रिया लवकर सुरळीत होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
advertisement
भारताला धडा शिकवण्याच्या नादात बेक्कार फसला चीन; पाकला मदत म्हणजे डोक्याला ताप
इंजिनच्या पुरवठ्यात सुधारणा
तेजस Mk-1A विमानांच्या उशिरा डिलिव्हरीचं मुख्य कारण GE Aerospace कंपनीकडून F404-IN20 इंजिनांच्या पुरवठ्यात झालेला उशीर आणि त्यासंबंधित सर्टिफिकेशन प्रक्रिया होती. सध्या HAL ने स्पष्ट केले आहे की, GE Aerospace ने पहिलं इंजिन सुपूर्त केलं आहे आणि उर्वरित संरचना (structures) तयार आहेत. इंजिन उपलब्ध होताच उत्पादन सुरु केलं जाईल.
वायुदलासाठी नव्या सामर्थ्याचा स्त्रोत
सध्या वायुदलाकडून जुनी विमाने जसे की MiG-21, MiG-27 आणि Jaguar हटवण्यात येत आहेत. अशा स्थितीत तेजस Mk-1A सारख्या नव्या लढाऊ विमानांची गरज अत्यावश्यक आहे. HAL ला याच पार्श्वभूमीवर आणखी 97 तेजस Mk-1A विमानांची ऑर्डर देण्याचा विचार सुरु असून, त्याची किंमत सुमारे 67,000 कोटी रुपये असू शकते. यामुळे IAF कडे एकूण 180 तेजस विमानांचा सशक्त ताफा तयार होईल.
कोणीच सेफ नाही, रशियावरील हल्ल्यानंतर समोर आले भयानक सत्य; वॉशिंग्टन हादरले
उत्पादन वाढवण्यासाठी...
रक्षा सचिव राजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ती खासगी कंपन्यांच्या सहभागातून लढाऊ विमानांचे उत्पादन वेळेत पूर्ण करण्यासाठी उपाययोजना शोधत आहे. HAL ने देखील काही महत्त्वाचे घटक खासगी कंपन्यांना आउटसोर्स करून उत्पादनक्षमता वाढवली आहे.
नाशिक प्लांट ठरणार निर्णायक
HAL चा नाशिकमधील नवा उत्पादन केंद्र देशाच्या स्वदेशी लढाऊ विमान प्रकल्पात एक मोठा टप्पा ठरणार आहे. सरकारचा हेतू आहे की 2025-26 पासून दरवर्षी 16-24 विमाने तयार होतील. वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी अलीकडेच वेळेवर डिलिव्हरी न होण्यावर नाराजी व्यक्त केली होती आणि डेडलाइन राखण्यावर भर दिला होता. सध्या नाशिक प्लांटमधून येणारे पहिले Mk-1A विमान चाचण्यांनंतर लवकरच वायुदलाच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
तेजस Mk-1A ची वेळेत डिलिव्हरी ही केवळ वायुदलासाठी नव्या सामर्थ्याची सुरुवात नसून देशाच्या ‘मेक इन इंडिया’ संरक्षण प्रकल्पासाठी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे. IAF साठी हे लढाऊ विमान सामरिक दृष्टिकोनातून निर्णायक ठरणार आहे.