कोणीच सेफ नाही, युक्रेनच्या रशियावरील हल्ल्यानंतर समोर आले भयानक सत्य; वॉशिंग्टन हादरले, संपूर्ण जगात भीतीची लाट

Last Updated:

Ukraine Drone Attack: युक्रेनने रशियावर एकाचवेळी पाच एअरबेसवर धडक ड्रोन हल्ला करून त्याची अण्वस्त्र क्षमतेची कणा मानली जाणारी विमाने उद्ध्वस्त केली आहेत. या हल्ल्याने केवळ रशियाच नव्हे, तर अमेरिकेच्या सुरक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

News18
News18
कीव/वॉशिंग्टन: युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक हवाई हल्ला चढवत एकाच वेळी पाच एअरबेसवर ड्रोनद्वारे आक्रमण केले. विशेष बाब म्हणजे या पैकी काही एअरबेस युक्रेनपासून तब्बल 4,000 किमी अंतरावर असलेल्या सायबेरिया भागात होते. या अभूतपूर्व हल्ल्यात यूक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे किमान 41 अण्वस्त्रक्षम बॉम्बर्स – जसे की Tu-95 आणि Tu-22M3, तसेच एक A-50 AEWAC (Airborne Early Warning and Control) जेट पूर्णपणे नष्ट झाले आहेत.
इराणने ‘रेडलाईन’ ओलांडली, उचलले अजब पाऊल; जगाला मोठा धोका,अमेरिकेला फाट्यावर...
या घटनेला रशियाच्या सामरिक वायुशक्तीवर झालेला सर्वात मोठा आणि थेट हल्ला मानले जात आहे. या हल्ल्यामुळे रशियाच्या अणुहल्ला क्षमतेवर आणि लष्करी प्रतिकारशक्तीवर मोठा आघात झाला असल्याचे लष्करी विश्लेषक सांगत आहेत.
अमेरिकेत खळबळ
‘द वॉर झोन’ या नामांकित संरक्षण विषयक वेबसाईटचे एडिटर-इन-चीफ आणि प्रसिध्द तज्ज्ञ टायलर रोगावे यांनी या घटनेनंतर अमेरिकेस देखील सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी त्यांच्या X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की – हा हल्ला केवळ रशियासाठीच नव्हे. तर अमेरिका आणि इतर देशांसाठीही धोक्याची घंटा आहे. अशा प्रकारचा हल्ला उद्या अमेरिकेतही होऊ शकतो. आपली सर्वात मौल्यवान विमाने सध्या जमिनीवर उभी आहेत. हीच ती कमकुवत जागा आहे. अमेरिका आणि तिच्या नेतृत्वाने यापुढे डोळे झाकून चालणार नाही.
advertisement
अमेरिका मागे का पडतोय? रोगावे यांचा गंभीर आरोप
टायलर रोगावे यांनी अमेरिकेच्या लष्करी तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणतात – चीनने मागील काही वर्षांत 400 हून अधिक हार्डन एअरक्राफ्ट शेल्टर्स उभारले आहेत. तर अमेरिका केवळ 22 शेल्टर्सवर थांबली आहे. हे पाहता अमेरिका आजही या नव्या धोक्यांना गांभीर्याने घेत नाही, हे स्पष्ट होते.
advertisement
पुतिन यांचा राग नियंत्रणाबाहेर, तयार केले किल झोन; Mission Anaconda सुरू
रोगावे यांनी सांगितले की ते गेल्या दशकभरापासून सतत इशारे देत आहेत की अशा प्रकारचे हल्ले कोणत्याही देशात होऊ शकतात. रशियामधील ही घटना केवळ त्या देशापुरती मर्यादित नसून संपूर्ण जगासाठीच वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धांची पूर्वसूचना आहे.
रशियाला मोठा धक्का
या हल्ल्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, युक्रेनने थेट रशियाच्या स्ट्रॅटेजिक एविएशन कॅपेसिटीवर लक्ष्य केले. Tu-95 आणि Tu-22M3 हे बॉम्बर्स – जे रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या रणनीतीचा गाभा मानले जातात – त्यांना नष्ट करण्यात आले.त्याचप्रमाणे A-50 AEWAC जेट – जे रशियाच्या हवाई नियंत्रण आणि वार्निंग सिस्टीमचा अत्यंत महत्त्वाचा भाग होते – तेही उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यामुळे फक्त विमानेच नाहीत तर रशियाच्या लष्करी रचनेचा कणा हादरला आहे.
advertisement
खळबळजनक दावा
रोगावे यांनी अमेरिकेमध्ये अलिकडच्या काळात दिसलेले UFOs याविषयी एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार- हे एलियनशी संबंधित नाहीत, तर हे खरेतर परदेशी हेरगिरी करणारे ड्रोन असू शकतात. त्यांनी 2021 मध्ये लिहिलेल्या लेखाचा संदर्भ देत सांगितले की – हे UAVs आहेत. जे अमेरिका वरील उच्च-सुरक्षा असलेल्या भागांमध्ये गुप्त माहिती गोळा करण्यासाठी वापरले जात असावेत.
advertisement
CSIS वॉरगेममधूनही अमेरिका धोका समोर
2023 मध्ये Center for Strategic and International Studies (CSIS) ने घेतलेल्या एका वॉरगेम अभ्यासात देखील हे उघड झाले होते की, जर अमेरिका व चीन यांच्यात तैवानवरून संघर्ष झाला. तर अमेरिका बहुतेक विमाने रनवेवरच नष्ट होतील. म्हणजेच खरी लढाई हवाईत न होता जमिनीवरच होईल – आणि तिथेच पराभवही निश्चित होईल.
मराठी बातम्या/विदेश/
कोणीच सेफ नाही, युक्रेनच्या रशियावरील हल्ल्यानंतर समोर आले भयानक सत्य; वॉशिंग्टन हादरले, संपूर्ण जगात भीतीची लाट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement