Water War: भारताला धडा शिकवण्याच्या नादात बेक्कार फसला चीन; पाकिस्तान, बांगलादेशला मदत म्हणजे डोक्याला ताप

Last Updated:

India China Water: भारताच्या दिबांग प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताच्या भूमिकेमुळे चीनची मदतही पाकिस्तानला वाचवू शकणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

News18
News18
बीजिंग: भारताने सिंधू नदीचं पाणी रोखण्याची शक्यता व्यक्त केली तेव्हा पाकिस्तान लगेच चीनकडे गेला. पाकिस्तानमध्ये चीनच्या तज्ज्ञांसोबत यावर चर्चा सुरू झाली आहे. यातून असा संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे की, चीन देखील भारताचं पाणी रोखू शकतो. मात्र खरा प्रश्न असा आहे की, चीन हे करू शकेल का? याचे उत्तर ‘नाही’ असेच अधिक स्पष्टपणे दिसते. कारण चीनचा महत्त्वाकांक्षी BRI प्रकल्प अनेक देशांत पसरलेला आहे. ज्यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश हे देश देखील सहभागी आहेत.
तिबेटहून सुरू होणाऱ्या दोन मोठ्या नद्या आहेत – सतलुज आणि ब्रह्मपुत्र. चीनची मोठी अडचण अशी आहे की या दोन्ही नद्या तिबेटमधून भारतात येतात आणि त्यानंतर पाकिस्तान व बांगलादेशात जातात. त्यामुळे भारताचं पाणी थांबवलं तर सर्वात जास्त परिणाम पाकिस्तान व बांगलादेशवर होणार आहे. याशिवाय ब्रह्मपुत्र नदीचं सुमारे 70-80 टक्के पाणी भारत आणि बांगलादेशात होणाऱ्या पावसावर अवलंबून आहे, तिबेटवर नाही.
advertisement
ब्रिगेडिअर शार्देन्दु (निवृत्त) यांचं मत आहे की, भारत आणि चीनमध्ये युद्ध झाल्यास चीन पाण्याला एक सामरिक शस्त्र म्हणून वापरू शकतो.
चीनचा वॉटर प्लॅन
ब्रह्मपुत्र नदीवर अनेक वर्षांपासून चीन डॅम बनवत आहे. चीनला भविष्यात भारतासाठी अडचण निर्माण करायची आहे. चीनने आपल्या 14व्या पंचवार्षिक योजनेत जगातील सर्वात मोठ्या हायड्रो प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. चीन दरवर्षी 300 अब्ज किलोवॅट वीज निर्मिती करण्याचा मानस बाळगतो. ब्रह्मपुत्रवर प्रस्तावित मेडोग डॅमवर काम सुरू आहे. हा डॅम चीनला भारतात जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह तांत्रिकदृष्ट्या नियंत्रित करण्याची क्षमता देतो.
advertisement
इराणने ‘रेडलाईन’ ओलांडली, उचलले अजब पाऊल; जगाला मोठा धोका,अमेरिकेला फाट्यावर...
चीनचे बहुतांश डॅम हे “रन-ऑफ-द-रिव्हर” प्रकारचे आहेत. याचा अर्थ यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवणूक केली जात नाही. तर पाण्याच्या प्रवाहातूनच वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी रोखण्याची क्षमता मर्यादित असते. भारत आणि चीनमध्ये सिंधू जल करारासारखा कोणताही बंधनकारक जलवाटप करार नाही. केवळ ब्रह्मपुत्र आणि सतलुज नदीच्या पाण्याचा प्रवाह 15 मे ते 15 ऑक्टोबर या कालावधीत शेअर करण्यासाठी एक सामंजस्य करार (MoU) आहे. तिबेटमध्ये सतलुज नदीला लांगकेन जाग्बो म्हणतात. सतलुज नदी तिबेटमध्ये सुमारे 322 किमी वाहते. त्यानंतर भाखडा डॅमपर्यंत ती 300 किमीचा प्रवास करते.
advertisement
भारताकडेही चीनसाठी उत्तर तयार
चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवर डॅम बांधून भारतात जलबाँब फोडण्याची तयारी केली तर त्याला उत्तर देण्यासाठी भारताने देखील तयारी केली आहे. भारताच्या अरुणाचल प्रदेशातील दिबांग भागात देशाचा सर्वात मोठा डॅम उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2008 मध्ये मनमोहनसिंग सरकारच्या काळात याचा शिलान्यास झाला होता. पण पर्यावरणीय मंजुरी मिळत नसल्याने काम सुरू होऊ शकले नव्हते.
advertisement
पुतिन यांचा राग नियंत्रणाबाहेर, तयार केले किल झोन; Mission Anaconda सुरू
2019 मध्ये मोदी सरकारने या डॅमला मंजुरी दिली आणि त्यानंतर कामाला वेग आला. आता पर्यावरणीय मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. हा डॅम देशासाठी केवळ 3000 मेगावॅट वीज निर्मितीसाठी उपयुक्त ठरणार नाही. तर चीनकडून पाणी थांबवून अरुणाचलमध्ये कोरडा पडण्याची स्थिती आणि जास्त पाणी सोडून पुराच्या स्थितीला उत्तर देणाराही ठरणार आहे. हा डॅम येत्या 9 वर्षांत पूर्ण होणार असून, याची उंची 288 मीटर असेल. त्यामुळे तो देशातील सर्वात मोठा आणि आशियातील आठव्या क्रमांकाचा डॅम ठरणार आहे.
advertisement
भारतावर होणारे परिणाम
ब्रह्मपुत्र नदीला चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये यारलुंग सांग्पो म्हणतात. ही नदी भारताला 30 टक्के प्यायच्या पाण्याची आणि 44 टक्के हायड्रोपॉवर प्रकल्पांची गरज भागवते. तिबेटमधून येणारी सतलुज नदी पंजाब, हरियाणा आणि हिमाचलसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर चीनने अचानक पाणी रोखले, तर पंजाब आणि हरियाणातील गहू आणि भातशेतीवर परिणाम होऊ शकतो. ब्रह्मपुत्र नदी अरुणाचल, आसाम आणि बांगलादेशासाठी जीवनवाहिनी आहे. आसाम आणि अरुणाचलमधील भात आणि इतर पिकांची सिंचन क्षमता कमी होऊ शकते. हायड्रो प्रकल्पांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/विदेश/
Water War: भारताला धडा शिकवण्याच्या नादात बेक्कार फसला चीन; पाकिस्तान, बांगलादेशला मदत म्हणजे डोक्याला ताप
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement