बुरहानपुर, 21 नोव्हेंबर : आजपर्यंत तुम्ही 5 स्टार आणि मोठं मोठे हॉटेल पाहिले असतील. परंतु त्यांमध्ये रोषणाईसाठी तसेच तेथील खोल्या थंड ठेवण्यासाठी विजेची आवश्यकता असते. परंतु मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे शाह बाजारमध्ये एक वास्तू आहे. याला मुघलांच्या काळातील 5 स्टार हॉटेल देखील म्हंटले जाते. येथे 110 खोल्या असून या खोल्या विजेशिवाय एसी प्रमाणे थंड राहतात.
advertisement
अकबर आणि जहांगीर यांच्या काळात तयार झाली होती वास्तू :
इतिहासकार कमरुद्दीन फलक यांच्याशी लोकल 18 च्या प्रतिनिधींनी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, 'हे मुघल काळातील पंचतारांकित हॉटेल आहे. हे 1623-24 मध्ये बांधले गेले. हे अकबर आणि जहांगीरच्या बांधण्यात आले होते. या हॉटेलमध्ये 110 खोल्या आहेत. ब्रिटीश राजदूत सर्टॅमस रो हे देखील येथे 15 दिवस राहिले होते. या मुघलकालीन हॉटेलची कलात्मकता अशी होती की इथल्या खोल्या दिवे आणि विजेशिवाय एसीसारख्या थंड राहतात.
हॉटेल बांधकामासाठी दगड आणि चुन्याचा वापर :
मुघलकालीन ही वास्तू दगड, माती आणि चुना यांचा वापर करून बांधली आहे. हे हॉटेल आजही सुअवस्थेत असून येथील सर्व खोल्या सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचे संवर्धन पुरातत्व विभागाकडून केले जात आहे. आजही ते पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे पोहोचतात.
