TRENDING:

Accident : कारची खासगी बसला धडक, दोन्ही गाड्या रस्त्यावरून 20 फूट खाली कोसळल्या; 7 ठार

Last Updated:

भरधाव कार दुसऱ्या बाजूने निघालेल्या खासगी बसला धडकली. यानंतर दोन्ही गाड्या रस्त्यावरून 20 फूट खाली घसरल्या. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊ आग्रा एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला. भरधाव कार दुसऱ्या बाजूने निघालेल्या खासगी बसला धडकली. यानंतर दोन्ही गाड्या रस्त्यावरून २० फूट खाली घसरल्या. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी मानवी साखळी बनवून जखमींना बाहेर काढलं. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
News18
News18
advertisement

नागालँडची खासगी बस रायबरेलीहून ६० प्रवाशांना घेऊन दिल्लीला जात होती. तर दुसऱ्या बाजूने आग्र्याकडून लखनऊला जाणारी कार अनियंत्रित झाली. दुभाजक तोडून अचानक बससमोर आली. कारला धडकण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही वाहनांची धडक झाली. यानंतर बस आणि कार रस्त्याकडेला २० फूट खाली कोसळली.

advertisement

अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. बचावकार्य राबवत जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. तर अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. कारमधील तिघे जण अपघातात मृत्यूमुखी पडले असून यात मायलेकाचा समावेश आहे. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. बसमधील चौघांचा मृत्यू झाला असून यातील दोघांची ओळख पटलेली नाही. जखमींमध्ये सर्वाधिक अमेठी, रायबरेली आणि लखनऊमधील प्रवाशांचा समावेश आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा नाद खुळा, साडेआठ एकरात आमराई, 80 लाखांची कमाई, संत सावता महाराजांच्या गावचा Video
सर्व पहा

एसएसपी संजय वर्मा यांनी सांगितलं की, कार दुसऱ्या बाजूच्या लेनवर आल्यानं हा भीषण अपघात झाला. या अपघाताची चौकशी केली जात आहे. कार आणि बसमध्ये असलेल्या सात जणांचाा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर ४० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. प्रशासकीय अधिकारी जखमींच्या उपचाराकडे लक्ष ठेवून आहेत. काहींना किरकोळ दुखापत झाली होती त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Accident : कारची खासगी बसला धडक, दोन्ही गाड्या रस्त्यावरून 20 फूट खाली कोसळल्या; 7 ठार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल