छत्तीसगड : छत्तीसगडमधून मोठी बातमी समोर येत आहे, माओवादी संघटनेला पुन्हा एकदा मोठा हादरा बसला आहे. पाच कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या माओवादी केंद्र समितीचे दोन जहाल माओवादी ठार झाले आहेत. छत्तीसगड पोलीस व एस आर पी एफच्या जवानांना मोठ यश मिळालं आहे. माओवाद्यांच्या गड असलेल्या अबूजमाडमध्ये नारायणपूर येथे झालेल्या चकमकीमध्ये माओवादी ठार झाले आहेत. ठार झालेले दोन्ही माओवादी मोठे कॅडर होते.
advertisement
दोन्ही नेते माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचे सदस्य आहेत..कादरी सत्यनारायण उर्फ कोसा आणि विकल्प उर्फ कटला रामचंद्र रेड्डी या दोघांवर सगळ्या राज्यात मिळून प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा बक्षीस आहे. महाराष्ट्राचा शेवटचं पोलीस स्टेशन असलेल्या कवंडे सीमेपासून दहा किलोमीटर अंतरावर माओवाद्यांच्या गड असलेल्या अबूजमाडमध्ये नारायणपूर पोलिसांनी तीन दिवसापासून सुरू केलेल्या अभियानात आज या चकमकीत यश मिळालं आहे..
शेकडो जवानांचे बळी
गडचिरोली जिल्ह्यात तीस वर्षांपूर्वी माओवाद्यांची संघटना बांधणी करण्यात या दोघांची मुख्य भूमिका होती. दंडकारण्यात घडलेल्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांमध्ये या दोघांनी मुख्य भूमिका बजावली आहे. ज्यात शेकडो जवानांचे बळी गेले आहेत
माओवाद्यांचे दोन बडे नेते ठार
छत्तीसगड पोलीस व एसआरपीएफच्या माध्यमातून मोठं सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं आहे. या भागात लपून बसलेल्या माओवाद्यांचा या सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे. आज सर्च ऑपरेशन सुरू असतानाच माओवादी आणि एसआरपीएफमध्ये चकमक झाली, या चकमकीमध्ये दोन माओवादी ठार झाले आहेत. तब्बल तीन दिवस ही चकमक सुरूच होती. या चकमकीत माओवाद्यांचे दोन बडे नेते ठार झाले आहेत.
अनेक महत्वाचे नेते ठार
घडलेल्या चकमकीनंतर घटनास्थळी संपूर्ण जंगल परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी या भागात आपले लक्ष केंद्रित केले असून इतर लपलेले माओवादी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही वर्षांत सरकारने माओवादविरोधी मोहिम अधिक व्यापक केल्या असून अनेक महत्वाचे नेते ठार झाले आहेत.