नेमकं काय झालं? पाहा
अचानक हात पकडून खेचण्याचा प्रयत्न
जनसुनावणीदरम्यान एका व्यक्तीने मुख्यमंत्री यांचे काही कागदपत्रे दिल्यानंतर अचानक हात पकडून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला. या वेळी थोडी धक्काबुक्की झाली. त्यानंतर लोकांनी त्या व्यक्तीला पकडले. तो कोण होता आणि इतर सर्व गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत. मुख्यमंत्री यांची प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. त्या एक खंबीर महिला असून त्यांच्या डोक्याला थोडी दुखापत झाली आहे. राजकारणात अशा घटना घडणं निंदनीय असल्याचंही दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटलं आहे.
advertisement
दिल्ली पोलिसांनी काय म्हटलंय?
दरम्यान, दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की, आरोपीने त्याचं नाव राजेश खिमजी असं सांगितलं आहे आणि तो गुजरातमधील राजकोटचा रहिवासी असल्याचं सांगितलं आहे. त्याचं नाव आणि पत्ता पडताळला जात आहे. त्याची कागदपत्रे देखील तपासली जात आहेत.
advertisement
Location :
Delhi
First Published :
August 20, 2025 11:08 AM IST
मराठी बातम्या/देश/
CM Rekha Gupta Attacked : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यावर हल्ला, हल्लेखोर पोलिसांना चकवा देऊन CM हाऊसमध्ये कसा शिरला?