Delhi Blast Live updates: दिल्ली स्फोटासाठी वापरली भयंकर रसायने? घटनास्थळावरून नमुने ताब्यात
लाल किल्ला स्फोटात अमोनियम नायट्रेट, तेल आणि डेटोनेटर वापरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तीव्र धमाक्यामुळे तपास यंत्रणांनी आता अमोनियम नायट्रेटसोबत तेल (इंधन) आणि डेटोनेटरच्या वापराची शक्यता तपासायला सुरुवात केली आहे. मात्र, फॉरेन्सिक तपासणी अहवाल आल्यानंतरच या थिअरीची खात्री होईल.
एजन्सींना घटनास्थळी मागील स्फोटांप्रमाणे ठोस पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे आता तपासाचा केंद्रबिंदू अमोनियम नायट्रेट + तेल + डेटोनेटर या कॉम्बिनेशनकडे वळला आहे. फॉरेन्सिक टीम्सने काल रात्री घटनास्थळावरून नमुने घेतले असून, त्यांच्या रिपोर्टनंतरच नेमका कोणता स्फोटक पदार्थ वापरण्यात आला होता हे स्पष्ट होईल. तज्ज्ञांच्या मते, अमोनियम नायट्रेटमध्ये तेल आणि डेटोनेटर मिसळल्यास मोठा स्फोट होऊ शकतो.
जरी इलेक्ट्रिक डेटोनेटरचा वापर असू शकतो, तरी घटनास्थळी अशा कोणत्याही इलेक्ट्रिक डिव्हाइसचे अवशेष सापडले नाहीत, त्यामुळे मॅन्युअल किंवा नॉन-इलेक्ट्रिक डेटोनेटरचा वापर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.