कार पार्किंगमध्ये जवळपास 3 तास उभी
कारचा स्फोट होण्याआधी सदर ह्युंडाइ i20 कार सुनहेरी मशीदजवळील पार्किंगमध्ये जवळपास 3 तास उभी होती. ही पार्किंग स्फोट झालेल्या जागेजवळच होती. सोमवारी संध्याकाळी चार वाजल्याच्या सुमारास दर्यागंज मार्केट परिसरातून निघताना दिसली. त्यानंतर कार सुनहेरी मशीदजवळील पार्किंगमध्ये दिसली. सायंकाळी 6.22 वाजताच्या सुमारास पार्किंगमधून कार छट्टा रेल चौकात यू-टर्न घेत लोअर सुभाष मार्गाकडे जातानाही कॅमेऱ्यांनी कैद केली. त्यानंतर मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळच्या सिग्नलजवळ आल्यावर कारचा स्फोट झाला.
advertisement
दोन संशयितांची नावं समोर
दिल्ली स्फोट प्रकरणात दोन संशयितांची नावे समोर आली आहे. मोहम्मद उमर आणि तारिक अशी संशयितांची नावे असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटांसाठी वापरलेली i-20 कार तारिकच्या नावावर होती. मोहम्मद उमरने कार चालवत नेऊन आत्मघाती हल्ला केल्याचा संशय समोर येत आहे. मोहम्मद उमर सुसाईड बॉम्बर होता का? असा सवाल विचारला जात आहे. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
पुलवामा हल्ल्याशी कनेक्शन?
दरम्यान, प्राथमिक तपासानुसार दिल्लीतील हा स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता आहे. कारमध्ये स्फोटक पदार्थ असल्याचे संकेत मिळाले असून, पुलवामा जिल्ह्यातील एका व्यक्तीशी जोडले जाणारे वाहन ट्रेस करण्यात आले आहे. त्यामुळे हा दहशतवादी हल्ला आहे की काय? असा सवाल विचारला जात आहे.
