Delhi Red Fort Blast : दिल्ली ब्लास्टच्या मागे ‘जैश-ए-मोहम्मद’ची महिला विंग? तपासात मसूद अझहरच्या बहिणीचं कनेक्शन समोर!

Last Updated:

Delhi Red Fort Blast Jaish Connection : अटक केलेल्यांमध्ये एक मौलवी आणि एका महिलेसह 8 जणांचा समावेश आहे. दहशतवादी मॉड्यूलला मदत करणार्‍या डॉक्टर महिलेला लखनौमधून अटक करण्यात आली आहे.

Delhi Red Fort Blast Jaish Connection
Delhi Red Fort Blast Jaish Connection
Delhi Red Fort Explosion : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या लाल किल्ला स्फोटाच्या तपासाला आता एक मोठं वळण लागलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान फरीदाबादमधून अटक झालेल्या एका महिलेबद्दल गंभीर खुलासा झालाय. ही महिला दहशतवादी संघटनेसाठी रिक्रूटमेंट नेटवर्क तयार करण्याच्या मोठ्या जबाबदारीवर होती, ज्यामुळे तपास यंत्रणांना देशातील एका मोठ्या आणि सक्रिय नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता वाटत आहे.

जमात-उल-मोमीनात महिला विंग

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, फरीदाबादमध्ये पकडलेली डॉ. शाहीना ही थेट दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) च्या महिला विंगची. जमात-उल-मोमीनात असं या महिला विंगचं नाव आहे. भारतातील प्रमुख म्हणून कार्यरत होती. तिला भारतात महिलांसाठीचे रिक्रूटमेंट जाळे उभे करण्याची आणि ते मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या खुलाशाने दहशतवादी संघटना आता देशातील महिलांनाही लक्ष्य करत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
advertisement

मसूद अझहरची सख्खी बहीण

जैश-ए-मोहम्मदच्या या महिला विंगचे मुख्य नेतृत्व पाकिस्तानमधून चालते. पाकिस्तानमध्ये 'जमात-उल-मोमीनात' (Jamaat-ul-Mominaat) या संघटनेचे नेतृत्व सादिया अझहर करते. सादिया अझहर ही जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहर याची सख्खी बहीण आहे. विशेष म्हणजे सादिया अझहरचा पती युसूफ अझहर हा देखील एक कुख्यात दहशतवादी असून तो कंधार विमान अपहरण प्रकरणातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक होता. या सर्व माहितीमुळे आता जैशचे भारतातील सक्रिय महिला नेटवर्क किती मजबूत आहे, यावर तपास यंत्रणांनी आपली चौकशी अधिक तीव्र केली आहे.
advertisement

दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त

दरम्यान, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये राबविलेल्या संयुक्त शोधमोहिमेदरम्यान प्रमुख दहशतवाद्यांसह 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये 360 किलो स्फोटकांचा समावेश आहे. अटक केलेल्यांमध्ये एक मौलवी आणि एका महिलेसह 8 जणांचा समावेश आहे. दहशतवादी मॉड्यूलला मदत करणार्‍या डॉक्टर महिलेला लखनौमधून अटक करण्यात आली आहे. डॉ. शाहीन असे तिचे नाव आहे. तिच्या कारमधून एक एके-47 रायफल जप्त करण्यात आली आहे.
advertisement
लाल किल्ला स्फोटानंतर तपास यंत्रणांनी सोशल मीडिया आणि मोबाइल डंप डेटा तपासणी मोहीम सुरू केली आहे. लाल किल्ल्याच्या आसपासच्या परिसरात ऑपरेट झालेल्या सर्व मोबाइल नंबरांचा डंप डेटा गोळा केला जात आहे. ज्या कारमध्ये स्फोट झाला, त्या वाहनाशी संबंधित नंबर कोणते होते, हे शोधण्यासाठी पार्किंग परिसरातील सर्व फोन डेटा तपासला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Delhi Red Fort Blast : दिल्ली ब्लास्टच्या मागे ‘जैश-ए-मोहम्मद’ची महिला विंग? तपासात मसूद अझहरच्या बहिणीचं कनेक्शन समोर!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement