चौकशीसाठी आठपेक्षा अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी सामग्री, स्फोटके, शस्त्रं आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी आणखी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तिघांचा काय कट होता? नेमकं काय मोठं घडवणार होते का? आणखी यामध्ये कुणाचा समावेश आहे या सगळ्याची कसून चौकशी केली जात आहे.
advertisement
ANI वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस विशेष पथकाने स्फोटकं बनवण्यासाठी वापरले जाणारे काही भाग देखील जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले संशयित पाकिस्तानमधील सूत्रधारांच्या संपर्कात होते. ते यासाठी अनेक सोशल मीडिया खात्यांचा वापर करत होते. या कटातील मुख्य सदस्य अशरफ दानिश भारतातून काम करत होता आणि पाकिस्तानमधील व्यक्तींशी एन्क्रिप्टेड आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सद्वारे संपर्क साधत होता.
भारतातील तरुणांना कट्टरपंथी बनवून आपल्या नेटवर्कमध्ये भरती करणे हा होता. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी दोघे दिल्लीतून आणि प्रत्येकी एक मध्य प्रदेश, हैदराबाद आणि रांची येथून अटक करण्यात आला आहे. दानिशकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सल्फर पावडर, तांब्याच्या पट्ट्या, बॉल बेअरिंग्ज, वायर, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली आहे.