TRENDING:

सूरतमध्ये रस्त्यावर हिरे पडले? गोळा करण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी

Last Updated:

अनेकदा लोक खोट्या अफवा पसरवतात आणि लोकांची तुंबड गर्दी पहायला मिळते. आत्तापर्यंत अशा अनेक खोट्या घटना, अफवा समोर आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
किर्तेश पटेल, सूरत, 25 सप्टेंबर :अनेकदा लोक खोट्या अफवा पसरवतात आणि लोकांची तुंबड गर्दी पहायला मिळते. आत्तापर्यंत अशा अनेक खोट्या घटना, अफवा समोर आल्या आहेत. अशीच काहीशी घटना समोर आलीय ज्यामध्ये रस्त्यावर पडलेल्या हिऱ्यांसाठी गर्दी झाली. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
सूरतमध्ये रस्त्यावर हिरे पडले?
सूरतमध्ये रस्त्यावर हिरे पडले?
advertisement

सूरत मधून एक घटना समोर आलीय. मिनी बाजार मार्केटमध्ये रस्त्यावर हिरे पडल्याची अफवा उडाली. मग काय रस्त्यावर गर्दी जमा झाली आणि काहींनी हिरे गोळा करायला सुरुवात केली. याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

हिरे उद्योगातील मंदीमुळे संतप्त व्यापाऱ्यांनी सार्वजनिक रस्त्यावर हिरे फेकल्याचा मेसेज व्हायरल झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर हिरे शोधू लागले. हे हिरे अमेरिकन हिरे असू शकतात, असं स्थानिक पातळीवर चर्चा आहे. हिरे रस्त्यावर पडल्याने लोकांची तुफान गर्दी तिथे हिऱ्यांचा शोध घेण्यासाठी जमली.खरे हिरे असतील तर ते विकून चांगले उत्पन्न मिळेल या मानसिकतेने लोक हिरे शोधू लागले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान, हे खरे हिरे किंवा चांगल्या दर्जाचे सिंथेटिक हिरे नसून दागिने किंवा साडीच्या कामात वापरले जाणारे बनावट हिरे असल्याचं समोर आलं. मात्र, काही वेळातच ही घटना मिनी मार्केटमध्ये वाऱ्यासारखी व्हायरल झाली.

advertisement

मराठी बातम्या/देश/
सूरतमध्ये रस्त्यावर हिरे पडले? गोळा करण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल