TRENDING:

'काहीही करा, पण प्रेम करू नका...', गर्लफ्रेंडने छळलं, इमोशनल पोस्ट लिहून नरेंद्रची चर्रर्र करणारी एक्झिट

Last Updated:

प्रेम, विश्वासघात आणि त्यानंतर ब्लॅकमेल... सततच्या छळाला कंटाळून 27 वर्षांच्या तरुणाने त्याचं आयुष्य संपवलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Crime : प्रेम, विश्वासघात आणि त्यानंतर ब्लॅकमेल... सततच्या छळाला कंटाळून 27 वर्षांच्या तरुणाने त्याचं आयुष्य संपवलं आहे. नरेंद्र सिंग उर्फ गोविंद सिंधा असं या तरुणाचं नाव आहे. आधीची प्रेयसी आणि तिच्या पतीकडून होत असलेल्या छळामुळे नरेंद्रने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. सुरूवातीला नरेंद्रचा मृत्यू अपघात म्हणून नोंदवण्यात आला, पण अधिक तपास केला असता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. एका हॉटेलच्या खोलीमध्ये सापडलेल्या हस्तलिखित चिठ्ठीतून या प्रकरणाला वेगळं वळण लागलं.
'काहीही करा, पण प्रेम करू नका...', गर्लफ्रेंडने छळलं, इमोशनल पोस्ट लिहून नरेंद्रची चर्रर्र करणारी एक्झिट (AI Image)
'काहीही करा, पण प्रेम करू नका...', गर्लफ्रेंडने छळलं, इमोशनल पोस्ट लिहून नरेंद्रची चर्रर्र करणारी एक्झिट (AI Image)
advertisement

नेमकं प्रकरण काय?

नरेंद्र सिंग हा 7 ऑगस्ट रोजी त्याच्या घरातून निघून गेला. शॉपिंगसाठी जात असल्याचं त्याने घरच्यांना सांगितलं होतं, पण यानंतर तो परतलाच नाही. काही दिवसांनी नरेंद्रच्या कुटुंबाला त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भावुक पोस्ट आढळल्या, ज्यात त्याला कसला तरी त्रास होत असल्याचं जाणवत होतं. 'सगळं काही करा, पण कोणावरही प्रेम करू नका. आम्ही 5 वर्ष एकत्र होतो, ही मुलगी तुला मारेल आणि उडून जाईल', अशी पोस्ट त्याने केली होती.

advertisement

या पोस्टसोबत नरेंद्रची आधीची गर्लफ्रेंड कृष्णासोबतचे 12 फोटो होते. ही पोस्ट पाहून नरेंद्रच्या घरच्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरूवात केली. व्हॉट्सअॅप ऍक्टिव्हिटीवरून नरेंद्रचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले, ज्यात तो गुजरातच्या बावळा येथील एका हॉटेलमध्ये आढळला. जेव्हा नरेंद्रचं कुटुंब हॉटेलमध्ये आलं, तेव्हा त्यांना नरेंद्र हॉटेल कॉम्प्लेक्सच्या छतावर चढला, तसंच कुणी जवळ आल्यास स्वतःला मारण्याची धमकी दिली. काही क्षणांनंतर त्याने ब्लेडने स्वतःचे मनगट कापले आणि उडी मारून आयुष्य संपवलं.

advertisement

पोलिसांना सापडली चिठ्ठी

सुरुवातीला बावळा पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदवला, पण हॉटेलमधल्या खोलीची तपासणी केली असता त्यांना हाताने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली, ज्यामुळे तपासाची दिशाच बदलून गेली. या चिठ्ठीमध्ये नरेंद्रने त्याची आधीची प्रेयसी कृष्णा मिस्त्री आणि तिचा पती राहुल मिस्त्री यांच्यावर छळाचा आरोप केला. राहुलने माझ्याकडून लाखो रुपये घेतले, पण हे कर्ज कधीही फेडलं नाही. या दोघांनी माझा छळ केला, म्हणून मी टोकाचे पाऊल उचलण्याच भाग आहे, माझ्या मृत्यूला हे दोघे जबाबदार आहेत, असंही नरेंद्रने या चिठ्ठीमध्ये लिहिलं.

advertisement

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलशी लग्न करण्यापूर्वी नरेंद्र आणि कृष्णा पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. लग्नानंतरही, नरेंद्र तिच्याशी भावनिकदृष्ट्या गुंतत राहिला. इमोशनल ब्लॅकमेल, आर्थिक वाद आणि मानसिक छळामुळे नरेंद्रने असा निर्णय घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. नरेंद्र हा गुजरातच्या खंबाटचा रहिवासी होता.

मराठी बातम्या/देश/
'काहीही करा, पण प्रेम करू नका...', गर्लफ्रेंडने छळलं, इमोशनल पोस्ट लिहून नरेंद्रची चर्रर्र करणारी एक्झिट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल