झांसी, 21 नोव्हेंबर : वेगाने बदलणारे तंत्रज्ञान आणि सायबर गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ हा जगासमोरचा एक मोठा विषय बनला आहे. जगात असे बरेच प्रश्न आहेत जे लोकांना विचारायचे आहेत परंतु त्यांना योग्य जागा किंवा योग्य व्यक्ती सापडत नाही. असाच एक प्रश्न पॉर्नशी संबंधित आहे. इंटरनेटवर सर्वाधिक शोधला जाणारा प्रश्न म्हणजे पॉर्न पाहणे गुन्हा आहे की नाही. पण, त्याचे नेमके उत्तर बऱ्याच जणांना माहित नसते.
advertisement
पॉर्न पाहणे गुन्हा आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही सायबर तज्ज्ञ अमित दुबे यांच्याशी बोललो. अमित दुबे म्हणाले की, पॉर्न पाहणे गुन्हा नाही. पण, ते पाहण्यासाठी कोणत्या प्रकारची सामग्री वापरली जाते यावर ते अवलंबून आहे. सर्वप्रथम चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे हा मोठा गुन्हा आहे. POCSO कायद्यानुसार चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते.
या 5 स्टार हॉटेलमध्ये एकही AC नाही, पण रुम राहतात थंडगार, असं का?
यासोबतच अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्यांवर भारत सरकारने बंदी घातली आहे. तेव्हा अशा संकेतस्थळांना जर तुम्ही भेट देत असाल तर तो गुन्हा ठरू शकतो. अनेक वेळा लोक यासाठी VPN किंवा प्रॉक्सी नेटवर्कचा अवलंब करतात. असे नेटवर्क वापरणे देखील बेकायदेशीर आहे.
अमित दुबे सांगतात की, एवढं असलं तरी हा असा गुन्हा नाही की ज्याबद्दल कोणालाही घाबरवंल किंवा धमकावलं जाऊ शकेल. जर कोणी तुम्हाला घाबरवत असेल किंवा धमकावत असेल तर तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकता. यासोबतच हेही लक्षात ठेवा की, भारत सरकारने बंदी घातलेल्या अशा कोणत्याही वेबसाइटला भेट देऊ नका.
